अनिल कपूरची ती अभिनेत्री जिला काम न मिळाल्यामुळे तिने केले होते ‘बी’ ग्रे’ड चित्रपटात काम, जाणून घ्या

80 आणि 90 च्या दशकाची अभिनेत्री सोनू वालियाला अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम मिळत नव्हते. चित्रपटांमध्ये ऑफर मिळत नसल्यामुळे त्यांना माजबुरीमध्ये बी ग्रेड सारख्या चित्रपटात काम करण्यास भाग पडले गेले. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्या इंडस्ट्रीमध्ये कधी आल्या व कधी गेल्या हे कोणाला माहितीदेखील नाही.

८० आणि ९० च्या दशकात खूप अभनेत्रींनी त्यांच्या प्रसिद्धीच्या काळात खूप चित्रपटात काम केले पण हळू हळू त्यांना चित्रपटात ऑफर मिळणे कमी व नंतर बंदच झाले. त्यातील एक अभिनेत्री सोनू वालियाचे नाव आहे. सोनू वालियाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली.

१९८५ साली तिने मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले ती वेळ तिच्या पूढील अधिक प्रसिद्धी मिळण्याचा पाया होता. तुमच्या अधिक माहितीसाठी सोनू वालियाने अनिल कपूरसोबत ‘खेल’ चित्रपटात काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. १९८८ साली आलेल्या ‘खुशी भर मांग’ या चित्रपटातही ती दिसली होती. या चित्रपटामुळे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली होती.

एवढेच नव्हे तर या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. अनिल कपूर सोबत चित्रीकरणानंतर तिने 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. पण काही काळानंतर अशीही एक वेळ आली जेव्हा तिला चित्रपटांमधील ऑफर मिळणे बंद झाले होते.चित्रपटांमध्ये काम नसल्यामुळे तिला बी ग्रे ड सारख्या चित्रपटात काम करण्यास भाग पडले होते.

सोनू वालियाने काही काळानंतर चित्रपटसृष्टी सोडण्याचा विचार केला आणि एनआरआय सूर्य प्रकाशशी लग्न केले. त्या दोघांनाही एक मुलगी आहे. मीडिया रिपोर्टनुसार सोनू आता अमेरिकेत राहते. तुमच्या अधिक माहितीसाठी,सोनू वालिया यांनी मानसशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. ती पत्रकारितेची विद्यार्थिनीही होती.

Leave a Reply

Your email address will not be published.