पडत्या काळात ज्याने दिली होती साथ, प्रसिद्धी मिळताच त्याच्यासोबत झालेला साखरपुडा मोडला सुप्रसिद्ध या अभिनेत्रीने..

अभिनेत्री रश्मिका मंदाना खूप कमी वेळात साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक यशस्वी अभिनेत्री बनली. रश्मिकाने २०१६ मध्ये साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. या चार वर्षात तिने स्वतःचे वेगळे स्थान सिनेइंडस्ट्रीत तयार केले आहे. यावर्षी संक्रांतीच्या निमित्ताने रश्मिका चा Sarileru Neekevvaru हा चित्रपट प्रदर्शित झाला.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप छान कमाई केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. बॉक्स ऑफिसवर चालल्या नंतर या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांनी अनेक मुलाखती दिल्या. एका मुलाखतीत रश्मिकाला तिच्या एक्स बॉयफ्रेंड म्हणजेच रक्षित शेट्टी बद्दल विचारले गेले. तेव्हा तिने त्याचे कौतुक करत म्हटले की तो एक प्रेमळ माणूस आहे.

रश्मिका आणि रक्षितचा साखरपुडा सुद्धा झाला होता. पण काही कारणास्तव या दोघांनी तो साखरपुडा मो-डला. त्यामुळे हे दोघे आता एकमेकांसोबत नात्यात नाहीत. या पाठीमागचं कारण रश्मीकाने तिला तिच्या करिअरवर फोकस करायचंय असं दिलं आहे. या दोघांची प्रेम कहाणी २०१६ मध्ये सुरू झाली होती.

२०१६ मध्ये रश्मिका मंदना ने किरिक पार्टी मधून साऊथ फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले. हा एक कन्नड भाषिक चित्रपट होता. या चित्रपटात रक्षित शेट्टी प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटा मुळेच ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले. त्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी साखरपुडा केला.

रक्षित शेट्टी हा सुद्धा कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील एक सुपरस्टार आहे. २७ डिसेंबर २०१९ ला रक्षित चा Avabe srimannarayana हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला. रक्षित शेट्टी सुद्धा या चित्रपटानंतर अनेक मुलाखती दिल्या. प्रत्येक मुलाखतीत त्याला त्याच्या एक्स गर्लफ्रेंड बद्दल विचारले जाते.

त्यावेळी तो देखील मोकळे पणाने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देतो. रक्षित त्याच्या ए-क्स गर्लफ्रेंड बद्दल बोलतो की ती नेहमीच मोठी स्वप्ने बघते. मी तिचा भू-तकाळ जाणतो त्यामुळे मला माहीत आहेत की तिला अशी स्वप्ने का पडतात. माझी अशी मनापासून इच्छा आहे की तिने तिची सर्व स्वप्ने साकार करावी.

रश्मिकाचा जन्म ५ एप्रिल १९९६ मध्ये झाला. तर रक्षित शेट्टी चा जन्म १ जून १९८३ ला झाला. तो एक अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट निर्माता व पटलेखक आहे. त्याने २०१० मध्ये चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले.

Leave a Reply

Your email address will not be published.