आपल्या सावत्र आईसोबत असे सबंध ठेवतो अभिनेता सनी,स्वतः हेमा मालिनीने केला खुलासा!!

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 40 वर्षांपूर्वी 1979 मध्ये लग्न केले. हेमापूर्वी धर्मेंद्रने प्रकाश कौर शी लग्न केले होते आणि त्यांना 4 मुले देखील आहेत. हेमा-धर्मेंद्रला अहाना आणि ईशा देओल या दोन मुली आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की सनी देओल आणि त्याची सावत्र आई हेमा यांमध्ये खूप वाईट संबंध आहेत. मात्र, सनी देओलशी तिचे कसे संबंध आहेत हे स्वत: हेमा मालिनी यांनी सांगितले आहे. हेमा मालिनीने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, तिचा आणि धर्मेंद्रचा मुलगा सनी देओल यांच्यातील संबंधांबद्दल सर्वांना जाणून घ्यायचे आहे.

हेमा ने म्हटले होते की’ “आमच्यात एक ‘सुंदर’ नातं आहे.” राजस्थानच्या दौसा येथे झालेल्या अपघातानंतर सनी देओल तिच्या घरी गेलेली पहिली व्यक्ती असल्याचे हेमा मालिनी यांनी सांगितले होते. हेमा मालिनी म्हणाली, सनी देओल ने तीची काळजीच नाही घेतली तर डॉक्टरांकडून अपडेट देखील घेतले. सनी देओलच्या या केअरिंग स्वभावामुळे हेमा मालिनीलाही थोडा धक्का बसला. यावरून ‘यावरून कळते की आमच्यामध्ये कसे नाते आहे’ असे हेमा म्हणाली होती.

हेमा मालिनीने तिच्या आत्मचरित्रात आणखी एका घटनेचा उल्लेख केला आहे. जेव्हा डिम्पल कपाडियामुळे तिचे पहिल्यांदा सनी देओलशी बोलने झाले होते. हेमाने त्या पुस्तकात सांगितले आहे की हे प्रकरण ‘दिल आशना है’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळीचे होते. ती म्हणाली, ‘डिंपल कपाडिया, मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत तिला त्या चित्रपटामध्ये पॅरा ग्लाइडिंग सीन शूट करायचा होता. पण शूटिंगच्या काही दिवस आधी विमानाच्या पायलटचा अपघात झाला होता. ज्यामुळे डिंपल खूप घाबरलेली होती.

डिंपल जेव्हा सनीशी याबद्दल बोलली तेव्हा डिंपल खूप घाबरलेली पाहून सनी चित्रपटाच्या सेटवर आला. सनी मला सेटवर भेटला, व मी आणि सनी प्रथमच एकमेकांशी बोललो होतो, तेव्हा सनीशी बोलल्यानंतर मी त्याला आश्वासन दिले की डिंपलला काहीही होणार नाही. सनी देओल यांचे नाव डिंपल कपाडियाशी नेहमीच जोडले जाते. दोघेही बर्‍याच काळापासून प्रेमसंबंधात राहिले होते असे म्हणतात. सनी देओलचे सध्या लग्न झाले आहे आणि तो आता दोन मुलांचा वडील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.