ऐश्वर्याच्या नकारा नंतर सलमान ने आणली होती ऐश्वर्याची कार्बन कॉपी असणारी अभिनेत्री….

सलमान खान आणि ऐश्वर्या रायची प्रेमकहाणी आजून ही ताजी आहे. तसेच, प्रत्येकाला त्यांच्या नात्यातील अडचणी आणि नाती तुटण्याचे कारण माहित आहे. हा ब्रेकअप सलमान खानला त्रास देणार असला तरी त्याचे कारणही तसे होते. ऐश्वर्या रायबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खान पूर्णपणे एकटा झाला,जेव्हा त्याने स्नेहा उल्लालकडे पाहिले तेव्हा अगदी त्याला ऐश्वर्या आठवली.

सलमानने स्नेहा उल्लालला त्याच्या पुढच्या चित्रपटात कास्ट करण्याचा विचार केला आणि सन 2005 मध्ये ‘लकी – नो टाइम फॉर लव्ह’ मध्ये स्नेहा उल्लालने सलमान खानच्या नायिका च्या भूमिकेत,चित्रपटाच्या विश्वात पाऊल टाकले. या सिनेमात सलमान खानने स्वत: स्नेहा उल्लाल ला लाँच केले होते. 2005 साली जेव्हा ‘लकी नो टाइम फॉर लव्ह’ हा चित्रपट पडद्यावर आला, तेव्हा अनेक प्रेक्षकांनी तिला ऐश्वर्या राय म्हणून समजले.

‘लकी नो टाइम फॉर लव्ह’ नंतर स्नेहाने ‘आर्यन’ (2006), ‘जाने भी दो यारों’ (2007) आणि ‘क्लिक’ (2009) सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, पण दुर्दैवाची बाब म्हणजे तिच्या एका पण चित्रपटाने पडद्यावर खास कामगिरी दर्शवू शकली नाही. बॉलिवूडमध्ये यश न मिळाल्यामुळे स्नेहा उलाल दक्षिणच्या चित्रपटांकडे वळली. तिथल्या काही चित्रपटांमध्येही तिने अभिनय केला, पण नंतर अचानक तिथूनही ती गायब झाली.

नंतर उघडकीस आले की स्नेहा उल्लाल ला ऑटोइम्यून डिसऑर्डर नावाच्या भ_यं_क_र आजाराने पीडित केले गेले होते आणि तिच्या उपचारामध्ये ती व्यस्त होती. हा रक्ताशी संबंधित आजार आहे. या आजाराने तिला इतके दु-र्ब-ल केले की तिला अंथरुणावरुन उभे राहणेही शक्य नव्हते. मात्र, आता स्नेहा उल्लाल या आजारातून मुक्त झाली आहे आणि पुन्हा एकदा अभिनय जगतात परतली आहे. यावर्षी तिची एक ‘एक्सपायरी डेट’ वेब सीरिज प्रसिद्ध झाली आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला चांगली पसंती दिली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.