बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. केदारनाथ चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांमध्ये स्थान मिळवणारी सारा अली खान तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील चर्चेचा विषय राहिली आहे. “कॉफी विथ करण” मध्ये मला रणबीर कपूरसोबत लग्न करायचे आहे, असे सांगून सारा अली खान ने सर्वांना आश्चर्यचकित केले.
यावेळी सारा खानचे वडील सैफ अली खान देखील उपस्थित होते. रणबीर कपूर हा करीना कपूरचा चुलत भाऊ आहे, तर सारा अली खान करीना कपूरची सावत्र मुलगी आहे कारण सैफ अली खानची दुसरी पत्नी करीना कपूर आहे. या वक्तव्यानंतर सारा अली खानवर बरीच टीका झाली होती.
सारा अली खान 24 वर्षांची आहे. सारा अली खान आजकाल कार्तिक आर्यनला डेट करत आहे. दोघेही बर्याच ठिकाणी एकत्र दिसले आहेत. हे दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात.