बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान, ही सैफ अली खानपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. 1991 मध्ये सैफ अली खानने अमृताशी लग्न केले होते. लग्नाआधी सैफ अली खान आणि अमृता एकमेकांना डेट करत होते. अमृता सैफ अली खानपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. सैफ आणि अमृताच्या लग्नात करीना कूपर खान देखील सहभागी होती.
मीडिया रिपोर्टनुसार, लग्नात करीना कपूर खानने सैफ अली खानचे अगदी वेगळ्या पद्धतीने अभिनंदन केले होते आणि म्हणाली होते की, ‘शादी मुबारक हो सैफ अंकल’ आणि सैफ देखील हसून म्हणाला- ‘थँक्यू बेटा’
सैफ अली खान आणि अमृताचे लग्न काही वर्ष चांगले चालले होते. पण,2004 साली या दोघांचा घ-ट-स्फो-ट झाला. या दोघांना, मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम अशी दोन मुले आहेत. दोन्ही मुले त्यांच्या आईसमवेत राहतात.
या दोघांच्या लग्नाला 13 वर्ष झाले होते. पण, काही वर्षांनंतर सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भेटले आणि हे कधी एकमेकांच्या जवळ आले हे दोघांनाही कळलं नाही.
2007 च्या ‘तशन’ या चित्रपटात या दोघांनाही एकमेकांना ओळखता आले आणि 5 वर्षे ते एकमेकांना डेट करत राहिले. या दोघांचे 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न झाले होते. सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांना मुलगा तैमूर अली खान आहे व करीना लवकरच आपल्या दुसर्या बाळाला जन्म देणार आहे.