देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदा चे क्षण आले आहे. अंबानी कुटुंबात एक नवीन सदस्य आला आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाशची पत्नी श्लोका यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता मुलाला जन्म दिला. आई व मुलगा दोघाणची ही प्रकृती निरोगी असल्याचे सांगितले जाते.
मुकेश आणि नीता अंबानी आजोबा झाले आहेत. नातवांसोबत अंबानीचे पहिले चित्रही समोर आले आहे. हा फोटो हॉस्पिटलमध्ये शूट करण्यात आला होता. यात अंबानी खूपच आनंदात दिसत आहेत. या आनंदाच्या निमित्ताने अंबानी कुटुंबाने अधिकृत निवेदनही प्रसिद्ध केले आहे.
आकाश अंबानी आणि श्लोकाचे 9 मार्च 2019 रोजी लग्न झाले होते. या लग्नाची चर्चा केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात होती. यात जगभरातील बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती, या लग्नात बॉलिवूड स्टार्सनीही हजेरी लावली. हे जगातील सर्वात महागड्या विवाहांपैकी एक होते.
आकाश अंबानी आणि श्लोका लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दोघांनीही शिक्षण पूर्ण केले आहेत. यावेळी दोघांची मैत्री झाली. शालेय शिक्षण घेतल्यानंतर श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून कायद्यात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
त्याचवेळी आकाशने अमेरिकेच्या ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून इकॉनॉमिक्समध्ये बॅचलर पदवी संपादन केली. महत्त्वाचे म्हणजे श्लोका एक बिझनेसवुमन तसेच एक समाजसेवीका आहे. 2015 मध्ये तीनी कनेक्ट फॉर नावाची स्वयंसेवी संस्था सुरू केली, जे गरजूंना शिक्षण, अन्न आणि घरे पुरवते. त्याचवेळी आकाश व्यवसाय हाताळतो.