सनी देओल 64 वर्षांचा आहे. 19 ऑक्टोबर 1956 रोजी सहेनवाल, लुधियाना (पंजाब) येथे जन्मलेल्या सनीने 1983 साली ‘बेताब’ या चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. दिग्दर्शक सनी देओलच्या शेवटच्या रिलीजविषयी बोलताना ‘पल पल दिल के पास’ हा चित्रपट होता.
पण या चित्रपटाला, येवढे यश मिळाले नाही. पूर्वी ‘पोस्टर बॉईज’ आणि ‘घायल वन्स अगेन’ सारखे चित्रपटदेखील अपेक्षेइतके यशस्वी ठरले नव्हते. तथापि, असे असूनही सनी देओलच्या शान-शौकत आणि जीवनशैलीत कोणतीही कमतरता नाही. फक्त चित्रपटच नव्हे तर सनी देओलच्या कमाईचे आणखी दोन स्रोत आहेत. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, सनी देओलकडे 2019 मध्ये सुमारे (365 कोटी) ची मालमत्ता आहे. सनी देओलच्या शुल्काबद्दल सांगायचे तर तो एका चित्रपटासाठी 7 ते 8 कोटी शुल्क घेतो .
अभिनयाव्यतिरिक्त सनी देओल चे स्वत: चे प्रोडक्शन हाऊस देखील आहे, ज्याचे नाव ‘विजेता फिल्म्स’ आहे. याअंतर्गत त्याने ‘दिल्लगी’ आणि ‘घायल वन्स अगेन’ असे चित्रपटही बनवले आहेत.तसेच, सनी देओल जाहिराती ही करतो. एका एन्डॉर्समेंटसाठी सनी जवळपास 2 कोटी रुपये घेतो. सनी लक्स कोजी, फॉर्मेट्रॅक ट्रॅक्टर, बीकेटी टायर यासारख्या कंपन्यांचे ब्रँड अॅम्बेसेडरही राहीला आहे.
सनी देओलच्या मालमत्तेबद्दल सांगायचे झाले तर त्याच्याकडे मुंबईतील जुहू (जेव्हीपीडी स्कीम) भागात एक आलिशान बंगला आहे. या व्यतिरिक्त पंजाबमध्ये आणि युके (इंग्लंड) मध्येही सनीचे वडिलोपार्जित घर व मालमत्ता आहे.
यूके मॅन्शनमध्ये सनी देओल अधूनमधून त्याचे चित्रपटांचे शूटिंगही करतात. काही वर्षांपूर्वी एक बातमी आली होती की सनी हिमाचल प्रदेशच्या मनाली येथे घर खरेदीची तयारी करत आहे. सनी देओलकडेही अनेक लक्झरी कार आहेत. यात पोर्श व्यतिरिक्त ऑडी ए 8 आणि रेंज रोव्हर सारख्या लक्झरी कारचा समावेश आहे. सनी जेव्हा जेव्हा शूटिंगसाठी जाते तेव्हा तो बऱ्याचदां कार चालवताना दिसतो.
सनी देओल 23 एप्रिल 2019 रोजी भाजप ज्वॉइन झाला आणि पॉलिटिक्स मद्ये दाखल झाला. सनी ने पंजाबमधील गुरदासपूर येथून लोकसभा निवडणूक लढविली आणि कॉंग्रेसचे उमेदवार सुनील जाखड़ यांचा पराभव केला आणि खासदार झाला. त्याची सावत्र आई हेमा मालिनी मथुराच्या भाजप खासदार देखील आहे.
सनी देओलने पूजा देओलशी लग्न केले आहे. त्याची पत्नी लाईमलाइट पासुन दूर राहते. सनीदेलल दोन मुले आहेत. थोरल्या मुलाचे नाव करण देओल, तर धाकटा मुलगा राजवीर आहे. करणने ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
सनी देओलने त्याच्या 37 वर्षांच्या कारकीर्दीत बर्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये बेताब, सोहनी महिवाल, सल्तनत, डकैत, राम-अवतार, जोशीले, त्रिदेव, चालबाज, निगाहें, आग का गोला, घायल, नरसिम्हा, विश्वात्मा, दामिनी, डर, जीत, घातक, जिद्दी, बॉर्डर, सलाखें, अर्जुन पंडित, चैम्पियन, गदर, इंडियन, मां तुझे सलाम, द हीरो, यमला पगला दीवाना, पोस्टर ब्वॉयज आणि मोहल्ला ही चित्रपट सामील आहेत.