अव्वल गायिका नेहा कक्कर नुकतीच रोहनप्रीत सिंगसोबत विवाहबंधनात अडकली आहे. या दोघांचे लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आणि चाहत्यांनीही त्यांना खूप पसंत केले. पण लग्नाच्या 10 दिवसानंतर इंटरनेटवर असे चित्र व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नेहा कक्कर च्या मांडीवर बाळ दिसत आहे आणि सोबत तिचा नवरा रोहनप्रीत आहे.
हे चित्र पाहिल्या नंतर चहात्यांनी कंमेंट्स करण्यास सुरु केले आणि काहीजण असे ही म्हणतात की नेहा ने इतक्या घाईत का लग्न केले?नेहा कक्कर आणि गायक रोहनप्रीत सिंग यांचे 24 ऑक्टोबर रोजी दिल्लीत मोठ्या उत्साहात लग्न झाले होते आणि 26 ऑक्टोबर रोजी चंदीगडमध्ये भव्य स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नेहा आणि रोहन त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये खूपच सुंदर दिसत होते.सोशल मीडियावर या दोघांमधील बॉन्डिंगही पाहायला मिळालं. एक फंक्शनमध्ये नेहाने आपल्या पतीला सर्वांसमोर प्रपोज केले, तर दुसर्या फोटोमध्ये नेहा रोहनप्रीतला किस करताना दिसली. पण त्यांच्या मांडीवरील बाळ कोणाच आहे, हे तुम्हाला माहित आहे का??
वास्तविक, नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाच्या कार्यक्रमाचे एक चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये नेहाच्या मांडीवर एक अतिशय गोंडस बाळ दिसले. पण सत्य हे आहे की मुल नेहाचे नसून तिच्या काही परिचयाचे आहे आणि नेहाने तिला केवळ आपल्या मांडीवर घेतले आहे.नेहा कक्कर चे पती रोहनप्रीत देखील एक गायक आहेत आणि त्याला राइझिंग स्टार 2 (2018) व ‘सा रे गा मा पा लील चँप्स’ (2007) चा रिअॅलिटी शो मिळाला होता,दोघे काही काळा पासून एकमेकांना डेट करत होते आणि काही वेळातच दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केले. रोहनप्रीत नेहापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे.