बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, रणबीर कपूरमुळे ती चांगली आई होईल आणि तिच्यासाठी लग्न आणि बाळ खूप महत्वाचे आहेत. तसेच तिने सांगीतले होत की, लग्नानंतर ती काम करणार नाही.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा कामावर परतली आहे. अलीकडेच तिला एका शूट दरम्यान स्पॉट केले होते. दोन महिन्यांनंतर तिने शूट केले आहे. यावर्षी 11 जानेवारी रोजी तिने एका मुलीला जन्म दिला आहे. तेव्हापासून ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. दरम्यान, तीची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत ती म्हणत आहे की जेव्हा तिला मूल होईल तेव्हा ती काम करणार नाही.
यासह तिने मुलाखतीत असेही म्हटले होते की ती रणबीर कपूरमुळे ती एक महान आई होईल. वास्तविक, अनुष्काने 2015 मध्ये आलेेेल्या बॉम्बेे वेलवेट चित्रपटाच्या प्रमोशनवेळी असे सांगितले होते. या चित्रपटात तीच्यासोबतर कपूर देखील मुख्य भूमिकेत होता. रणबीरमुळे ती चांगली आई होईल असे तिने म्हाटले होते.
अनुष्का शर्मा एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, “जे काही घडत आहे ते सर्व (रणबीर कपूर) ला माहीत आहे. तो माझ्या मेकअप रूममध्ये येतो आणि ड्रॉ उघडतो. तसेच तो माझा हँडबॅग उघडतो. जर मी फोनवर असल तर, तो लगेच पाहतो की, मी फोनवर काय करत आहे. तो एक मूल आहे. मी एक चांगली आई होईल कारण माझ्याकडे रणबीर कपूर आहे. ”
यावर्षी अनुष्काने सिमी ग्रेवाल च्या चॅट शोमध्ये लग्न आणि बाळांच्या कल्पनांबद्दल बोलले होते. अनुष्का म्हणाली की, “लग्न माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. मला लग्न करायचे आहे आणि, मला मूल हवे आहे. तसेच माझे लग्न झाल्यावर मी काम करणार नाही अशी शक्यता आहे.”
शरीरात बदल होण्यामुळे सुख. व्होग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने तिच्या गरोदरपणाविषयी सांगितले होते की, “जेव्हा हे सर्व घडते तेव्हा आपण आपल्या शरीरावर अधिक प्रेमळ होता. जेव्हा मला हा बदल दिसला तेव्हा मी खूप आनंदि झाले. मी नेहमी मिडीटेशन करते, ही माझी रोजची सवय आहे. माझे आयुष्य संतुलित आहे, आणि मी ते असेच ठेवू इच्छित आहे.