३९ व्या वर्षीच मरण पावलेल्या पतीचा पुतळा बनवून साजरा केला ‘डोहाळे जेवणाचा’ सोहळा, या अभिनेत्रीची कहाणी एकूण भावूक व्हाल!!

चिरंजीवी सर्जा या कन्नड चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता आहेत त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1984 रोजी बंगळुरू येथे झाला.चिरंजीवी एक चित्रपट कुटुंबातील होते. त्यांचा मोठा भाऊ प्रसिद्ध अभिनेता ‘ध्रुव सरजा’ आहे,तर त्यांचे आजोबा कन्नड चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते शक्ती प्रसाद होते. चिरंजीवी यांनी वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी हे जग सोडले.

2009 साली चिरंजीवी सर्जाने कन्नड चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता.यानंतर ते दक्षिण सिनेमाच्या अनेक उत्तम चित्रपटांमध्ये दिसले,आपल्या 11 वर्षांच्या कारकीर्दीत चिरंजीवीने सुमारे 22 चित्रपटांत काम केले.

चिरंजीवी सरजाने अभिनेत्री मेघना राजशी लग्न केले.हे विवाह स्मरणीय बनविण्यासाठी दोघांनी आधी चर्चमध्ये लग्न केले आणि त्यानंतर हिंदू प्रथा प्रमाने सात फेरे ही घेतले.चिरंजीवी यांच्या निधनाच्या वेळी त्यांची पत्नी मेघना गर्भवती होती.चिरंजीवी वडील होण्यास खूप उत्सुक होते पण मुलाचा चेहरा न पाहता ते जग सोडून गेले.

चिरंजीवी सर्जाच्या मृत्यूच्या चार महिन्यांनंतर मेघनाचा ‘गोद भराई’ सोहळा पार पडला.तिने गोदभराईच्या सोहळ्यात तिच्या पतीचाही समावेश केला. प्रत्यक्षात सोहळ्या च्या वेळी मेघना खुर्चीवर बसली होती, तर चिरंजीवी सरजाचा पुतळा तिच्या शेजारी ठेवला होता.हा क्षण खूप भावनिक होता.

7 जून 2020 रोजी चिरंजीवीने बंगळूरमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.मिळालेल्या माहितीनुसार चिरंजीवी सर्जा यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.