या ‘दिग्गज’ अभिनेत्रीची मुलगी आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री.. वाचून बसेल आश्चर्याचा धक्का..

बॉलिवूड बद्दल बोलायचे झाले तर असे बरेच स्टार्स आहेत ज्यांनी फारच कमी वेळात ह्या इंडस्ट्री मध्ये आपले नाव कमावले आणि लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. त्यातील काही कलाकार आता आपल्यात नाहीत पण आजही लोक त्यांची खूप आठवण काढतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका कलाकाराबद्दल सांगणार आहोत, जिला सलमान खानची स्क्रीनवरची आई म्हणून ओळखले जात होते. होय आम्ही बोलत आहोत छोट्या व मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने वर्चस्व गाजवणाऱ्या रीमा लागू बद्दल.

आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की त्यांना गेल्या वर्षी स्वर्गवास झाला. तरीही चाहत्यांचे त्यांच्यावरचे प्रेम काही कमी झाले नाही. हृदयविकाराच्या झटक्यामुळे, वयाच्या 59 व्या वर्षी रीमा लागू यांचे नि-धन झाले. केवळ चित्रपटांमध्येच नाही तर वास्तविक जीवनातही रीमा यांची प्रतिमा एका आधुनिक आईची होती जी स्वत: सर्वकाही करत असे.

त्यांनी जे काही मिळवलेते केवळ आपल्या परिश्रमांच्या बळावरच कमावले आहे. या सक्सेस मागे त्यांची एक संघर्षमय कहाणी आहे. रीमा लागू यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि म्हणूनच त्या लहान वयातच चित्रपटांमध्ये गुंतली आणि बाल कलाकार म्हणून 9 चित्रपट केले. मराठी टीव्ही संकेतस्थळावरील वृत्तानुसार, रीमा यांचा अभिनयच असा होता की त्यांनी हायस्कूल संपताच अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

पण आज आम्ही तुम्हाला रीमाच्या मुलीबद्दल सांगणार आहोत जिचे नाव मृण्मयी आहे. आपल्यापैकी बर्याच जणांना माहीत नाहीये की मृण्मयी बहुतेक मराठी चित्रपटांमध्ये दिसली आहे. ‘3 इडियट्स’ चित्रपटात मृण्मयीने आमिर खानसोबत देखील काम केलं आहे.

मृण्मयीला देखील आईच्या पावलावर पाऊल ठेवत, तिच्या कलागुणांना अनुसरण करून तिला एक चांगली बॉलिवूड अभिनेत्री व्हायचे आहे. अशी बातमी आहे की ती लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे.

मृण्मयी सध्या बॉलिवूडमध्ये सक्रीय नसेल पण मृण्मयी मराठी चित्रपटांमध्ये बरीच सक्रिय आहे. आईची पसंती म्हणून मृण्मयी देखील टीव्ही शोमध्ये दिसणार आहे. सौंदर्याच्या दृष्टीने मृण्मयी बॉलिवूड अभिनेत्र्यांपेक्षा कमी नाही. तिच्या म्हणण्यानुसार तिला अजून मनासारखे रोल मिळाले नाहीयेत ज्यातून तिच्या कलागुणांना वाव मिळेल.

मृण्मयीने निवडक हिंदी आणि मराठी सिनेमांत अभिनय केला आहे. ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘सातच्या आत घरात’, ‘बयो’, ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’ या मराठी सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘बयो’ या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार मिळाला आहे.

मृण्मयी दिग्दर्शिका म्हणूनही नावारुपास येत आहे. आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’, राजकुमार हिराणींच्या ‘थ्री इडियट्स’, आमिर खान स्टारर ‘तलाश’ या सिनेमांसाठी तिने सहायक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे. यापुढेही तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत ज्या मध्ये ती आपले अभिनय कौशल्य प्रेक्षकांपुढे सादर करणार आहे.

मृण्मयी सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह राहते आणि काही ना कोणत्या कारणास्तव सोशल मीडियावर लेख लिहीत राहते. मराठी अभिनेत्री मृण्मयी आता लवकरच हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून आपले करियर बनवण्याच्या तयारीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.