सनी देओल सुपरस्टार आहे, 19 ऑक्टोबर ला सनीचा वाढदिवस होता.एक रोमँटिक चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात करणारा सनी,’इमेज अॅक्शन’ आणि ‘क्रोधित’ नायक बनला.बॉलिवूडचा सर्वात मोठा अॅक्शन हिरो म्हणून सनी देओलची ओळख आहे.अभिनयानंतर सनी देओलनेही राजकारणात प्रवेश केला आहे.ते गुरदासपूरचे खासदार आहेत.कारकीर्दीत सनी देओल कुठल्याच वादात अडकला नाही परंतु शाहरुख खानबरोबर त्याने जवळपास 16 वर्षे बोलणे केले नाही.
शाहरुख खान, सनी देओल आणि जूही चावला स्टारर फिल्म ‘डर’ हा चित्रपट तुम्हाला आठवत आसेल. या चित्रपटाने शाहरुखच्या कारकिर्दीला नवीन उड्डाण दिले, तर दुसरीकडे शाहरूख आणि सनी देओल या दोन बॉलिवूड स्टारमधील संघर्षाचे कारणही बनले. या चित्रपटा नंतर सनी देओलने शाहरुख खानशी बोलने बंद केले.
जेव्हा सनीला एकदा विचारले गेले होते की त्याने या चित्रपटा नंतर शाहरुख खानबरोबर 16 वर्ष, का बोलले नाही तर सनी म्हणाला- मी बोललो नाही असे नाही, परंतु मी त्याच्यापासून दूर असायचो.जर आम्ही कधी भेटलो च नाही तर बोलण्याचा प्रश्न ही येत नाही.
कथा अशी होती की त्यावेळी सनी देओल एक मोठा स्टार होता, म्हणून दिग्दर्शक यश चोप्राने त्याला ‘राहुल मेहरा’ आणि ‘सुनील मल्होत्रा’पैकी एक पात्र निवडण्याची ऑफर दिली. सुनील मल्होत्राचे सकारात्मक पात्र त्याच्यासाठी योग्य असेल, असे सनीला वाटले. म्हणून त्याने हे पात्र निवडले. आपल्याला नंतर घडलेले सर्व काही माहित आहे. किकक्क किरण म्हणत शाहरुख सर्वांचा आवडता झाला आणि सनीला पहिजे तेवड कौतुक मिळाल नाही.यानंतर सनीने यश चोप्राबरोबर कधीही काम केले नाही.
‘डर’ चित्रपटाच्या शूटिंगच्या एका भागा चे वर्णन सांगितले आहे.असं म्हणतात की शाहरुख खान एका दृश्यात सनी देओलला चाकू मारणार होता.ही चित्रपटाची पटकथा होती.या दृश्याबद्दल सनीने यश चोप्राशी बरीच चर्चा केली होती. ते म्हणाले की, चित्रपटात तो एक तंदुरुस्त कमांडो आहे,
अशा परिस्थितीत एखादा सामान्य मुलगा येऊन त्याला ठार करील, मग तो कमांडो काय कामाचा.पण तो सीन करावाच लगला कारण दिग्दर्शकाने सांगितले होते.या शूटिंग दरम्यान सनीला इतका राग आला की त्याने त्याच्या पॅन्टची दोन्ही खिसे फाडले. सनी देओल नी ही या घटनेचा उल्लेख केला आहे.