मधुबालासाठी धर्म बदलून,करीम अब्दुल बनले होते किशोर कुमार, केले होते चार लग्न!!

अभिनेता, संगीतकार, गायक, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता किशोर कुमार, सिनेमाच्या प्रत्येक शैलीत उत्कृष्ट कामगिरी करणारे आणि आपल्याच अटींवर त्यानी जे काही केले ते इतिहासिक बनले. किशोरचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. त्यानी कधीही संगीताचा अभ्यास केला नाही परंतु असे म्हणतात की ते प्रत्येक गाणे गाऊ शकत होते. 13 ऑक्टोबर 1987 रोजी किशोरने या जगाला निरोप दिला होता.

फिल्मी जीवनाशिवाय, किशोरदाआपल्या नात्यातील बातम्यांविशयी कायम चार्चेत रहायचा. त्याचे चार विवाह झाले होते.1951 मध्ये अभिनेत्री रुमा गुहाशी त्याचे प्रथम लग्न झाले होते. त्या काळात किशोर दा बॉलिवूडमध्ये एव्हडा ओळखला जात नव्हता. लग्नाच्या आठ वर्षानंतर 1958 मध्ये या दोघांचे घटस्फोट झाले. यामागील कारण मधुबाला होती.

विवाहित किशोर कुमार,त्या काळात मधुबालाच्या प्रेमात पडला होता. ज्या वेळी किशोर दाने मधुबालाला प्रपोज केले होते त्यावेळी ती तिच्या उपचारासाठी परदेशात जात होती. किशोर दा नी रूमाला घटस्फोट दिला आणि काही काळानंतर मधुबालाशी लग्न केले आणि इस्लाम धर्म स्वीकारला.

किशोर दा नी आपले नाव बदलून करीम अब्दुल असे ठेवले. तथापि, किशोर दाच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याचे नाते कधीही स्वीकारले नाही. किशोर दा चे हे लग्नही अयशस्वी झाले. हृदयाच्या छिद्रांमुळे मधुबाला मरण पावली आणि किशोर दा एकटाच राहिला.

मधुबालाच्या मृत्यूनंतर योगिता किशोर कुमारच्या आयुष्यात आली. ते दोघे आधी प्रेमात पडले आणि मग त्यांनी लग्न केले. 1976 मध्ये दोघांचे लग्न झाले व 1978 मध्ये दोघांचे घटस्फोट झाले.योगिताने नंतर मिथुन चक्रवर्तीशी लग्न केले.

योगितापासून घटस्फोटानंतर अभिनेत्री लीना चंद्रवरकरने किशोरच्या आयुष्यात प्रवेश केला.1980 मध्ये चौथ्या आणि शेवटच्या वेळी किशोर कुमारने लीनाशी लग्न केले व त्यांना एक मुलगा ‘सुमित कुमार’ आहे. लीना आणि किशोर यांच्यात 21 वर्षांचा फरक होता.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.