बॉलिवूड अभिनेत्री दिव्य भारती ही 90 च्या दशकाची बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक होती. प्रत्येकाला तिच्या सुंदर शैलीबद्दल कौतुक होते.संपूर्ण देश दिव्या भारतीशी परिचित आहे.पण तुम्हाला माहिती आहे काय की तिची बहीण, दिव्या भारतीपेक्षा सुंदर आहे. ती दिव्यासारखी बॉलिवूड अभिनेत्री देखील आहे.
दिव्या भारतीची बहीण आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कायनात अरोराबद्दल सांगणार आहोत.पण आतापर्यंत कायनातला आपली बहीण दिव्या भारती प्रमाने चित्रपटसृष्टीत लोकप्रियता मिळाली नाही. तिने बॉलिवूडच्या काही चित्रपटांत काम केले आहे.कायनात अरोरा चा जन्म 2 डिवसेंबर 1982 रोजी दिल्ली येथे झाला आहे.
कायनात अरोरा,अभिनेत्री दिव्या भारतीची चुलत बहीण आहे.तिने ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’, दिल्ली येथून ‘मर्चेंडाइजिंग’ कोर्स पूर्ण केला आहे.अक्षय कुमारच्या 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या खट्टा-मिठा या चित्रपटाद्वारे कायनात नी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.या चित्रपटात एका आयटम साँगमध्ये ती दिसली होती.
2011 मध्ये रिलीज झालेल्या ‘ग्रँड मस्ती’ चित्रपटात कायनातही दिसली होती. 2011 मध्ये कायनात दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या ‘सिक्रेट’ मध्येही काम केले होते.कायनात ने अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स च ‘एन्डोजिंग’ केल आहेत. ज्यामध्ये ‘लक्स’ आणि ‘कैडवी’ सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे.
बॉलिवूड व्यतिरिक्त कायनात तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2015 मध्ये कायनात अखेरच्या बॉलीवूड चित्रपटात ‘फरार’ मध्ये दिसली होती तेव्हापासून ती चित्रपटांमध्ये सक्रिय नव्हती,लोक कायनात ला चारू नावाने ही ओळखतात.सुंदरतेच्या बाबतीत कायनात कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. कायनात चित्रपटसृष्टीत बहीण दिव्या भारतीप्रमाणे लोकप्रियता मिळवू शकेल काय? हे फक्त वेळ ठरवेल.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.