रोनित रॉय एक अभिनेता आहे ज्याने आपल्या जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी खूप संघर्ष केला.त्याने टीव्ही आणि नंतर चित्रपटांतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांमध्ये बरीच प्रसिद्धी मिळविली आहे.सध्या प्रत्येकजण त्याला चांगल्या प्रकारे ओळखतात. रोनिट रॉयचा वाढदिवस 11 ऑक्टोबरला अस्तो. तुम्ही रोनित रॉय ला बर्याच वेगवेगळ्या पात्रांमध्ये पाहिले असेल.
प्रेक्षकांना त्याचे प्रत्येक पात्र आवडते. त्याच्या पात्रांमुळे तो लोकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्याचा धाकटा भाऊ रोहित रॉय देखील टीव्ही इंडस्ट्रीत एक अभिनेता आहे.आज आम्ही तुम्हाला त्याच्या जीवनाशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत.
रोनित रॉय नी शालेय शिक्षण संपल्यानंतर हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रम घेतला. त्याला अभिनयाचा खूप आवड होता, पण अभिनयाच्या जगात पाऊल ठेवणे इतके सोपे नाही. जेव्हा त्यानी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला तेव्हा तो मुंबईला गेला आणि सुभाष घई यांच्या घरी राहू लागला.रोनित रॉय ला चित्रपटसृष्टीत काम करायचे होते, पण सुभाष घई यांनी त्याला चित्रपटात काम करण्या बद्दल सांगितले की या उद्योगात काम मिळणे फार कठीण आहे. रोनित रॉय नी मुंबईच्या “सी रॉक हॉटेल” मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले.नोकरी दरम्यान त्याने अनेक अडचणींचा सामना केला. त्यानी फक्त हॉटेलमधील भांडी धुऊनच नव्हे तर टेबल साफ करण्याचे कामही केले.
रोनित रॉयने आपण अभिनय करणार असल्याचे मनावर ओढवले होते.आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्याने आयुष्यात खूप संघर्ष केला.बर्याच संघर्षानंतर, रोनित रॉय यांना 1992 मध्ये ‘जान तेरे नाम’ चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली होती.त्या काळात हा चित्रपट ठीक-ठाक चाल्ला पण रोनित रॉय ला आपलं करिअर साठी पहिजे ते स्थान मिळालं नाही.रोनित रॉय ने आपल्या टीव्ही करिअरची सुरूवात “कमल” या मालिकेतून केली होती. जेव्हा त्याला चित्रपटांमध्ये काम भेतले नाही तेव्हा तो टीव्ही इंडस्ट्रीकडे वळला.
रोनित रॉय ला एकता कपूरच्या प्रसिद्ध मालिका “कसौटी जिंदगी की” मध्ये काम करण्याची संधी मिळाली.या मालिकेत त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती, त्यानंतर तो या मालिकेचा कायमचा भाग झाला.
अभिनयाबरोबरच रोनित रॉय देखील एक व्यावसायिक मानुस आहे,अभिनेता रोनित रॉय अभिनयाबरोबरच स्वतःचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे “ऐस सिक्योरिटी और प्रोटेक्शन एजेंसी”आहे.त्याची कंपनी बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींना सुरक्षा प्रदान करते.
रोनित रॉय चे वैयक्तिक जीवन – रोनित रॉय च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जर आपण चर्चा केली तर त्याने दोन विवाह केले आहेत.अभिनेत्री आणि मॉडेल नीलम सिंगच्या लग्नापासून त्याला दोन मुले आहेत. 1991 मध्ये त्याचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी आहे.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.