१ नाही २ नाही तर ३ पेक्षा जास्त वेळा लग्न केले आहे या बॉलिवूड कलाकारांनी!!

किशोर कुमार – बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय गायक आणि अभिनेता,किशोर कुमारने 1-2 नव्हे तर 4 वेळा लग्न केले. किशोर कुमारने 1950 मध्ये बंगाली अभिनेत्री रुमा गुहा ठाकुर शी पहिले लग्न केले होते. त्यांचे लग्न 8 वर्षे चालले, त्यानंतर किशोर कुमारने 1960 मध्ये मधुबालाशी लग्न केले.9 वर्षांनंतर मधुबालाच्या निधनानंतर किशोर कुमारने तिची साथ सोडली.

किशोर कुमारची तिसरी पत्नी बॉलिवूड अभिनेत्री योगिता बाली होती. किशोर कुमारचे हे लग्न फक्त दोन वर्षे चालले.त्यानंतर 1980 साली किशोर दा लीना चंदावरकर यांच्या प्रेमात पडले ,पण हेसुद्धा फार काळ टिकू शकले नाही, कारण किशोर कुमार मृत्यूमुखी पडले

लकी अली – बॉलिवूडचा मल्टी-टैलेंटेड अभिनेता आणि गायक लकी अली यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्यासाठी फक्त एक लग्न कर्णे हे अनुकूल नाही आणि त्यानेही हे सिद्ध केले. परंतु त्यांचे आतापर्यंत 3 लग्न झाले आहेत. लकी यांची पहिली पत्नी ‘मेघन जेन मकक्लियरी’ होती.

मेघन आणि लकी यांनाही दोन मुले होती पण काही कारणांमुळे ती दोघेही विभक्त झाले. त्यांची दुसरी पत्नी इनाया होती, त्यांला दोन मुले आहेत. लकी अलीने २०१० मध्ये ब्रिटीश मॉडेल केट एलिझाबेथ हॅलेमशी लग्न केले आणि त्यांना दोन मुलेही झाली.

सिद्धार्थ रॉय कपूर – सिद्धार्थ हा बॉलिवूड चा प्रसिद्ध अभिनेता नसला तरी ग्लॅमर इंडस्ट्रीचा तो एक प्रसिद्ध चेहरा आहे. चित्रपट जगतात त्याचा चांगला प्रभाव आहे. सिद्धार्थ UTV चा प्रमुख आहे. हे सर्वांनाच ठाऊक आहे की सिद्धार्थने डिसेंबर 2012 मध्ये बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि प्रतिभावन अभिनेत्री विद्या बालनशी लग्न केले होते, परंतु विद्या सिद्धार्थची तिसरी पत्नी आहे हे फारसे कोनाला ठाऊक नाही. सिद्धार्थची पहिली पत्नी ही त्याची बालपणातील मैत्रीण होती. तर त्याची दुसरी पत्नी टीव्ही निर्माता होती, ज्यांच्यापासून त्याने 2011 मध्ये विभक्त केले होते.

संजय दत्त – बॉलिवूडमधील सर्वात कॉन्ट्रोवर्सियल अभिनेता संजय दत्तनेही मानयताशी लग्न करण्यापूर्वी दोन विवाहसोहळे केले. संजू बाबांची पहिली पत्नी रीचा शर्मा होती, तिचे 1996 मध्ये ब्रेन ट्यूमर आजाराने निधन झाले. त्यानंतर 1998 मध्ये संजय दत्तने रिया पिल्लईशी लग्न केले, आणि 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट ही झाला त्यानंतर त्याने 2008 मध्ये मानयताशी लग्न केले, ज्यांच्याबरोबर त्यांना दोन सुंदर मुले आहेत.

विधू विनोद चोपडा – बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माता विधू विनोद चोप्रा यांनीही तीन विवाहसोहळे केले आहे. त्यांची पहिली पत्नी चित्रपट संपादक रेणू सलूजा आणि दुसरी पत्नी शबनम सुखदेव होती.ती एका चित्रपट निर्मात्याची मुलगी होती. विधुचे दोन्ही विवाह घटस्फोटाने संपले. त्यानंतर त्यांची भेट लेखक आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्राशी झाले आणि दोघांनी 1990 मध्ये लग्न केले.

करणसिंह ग्रोव्हर – या यादीतील पुढचे नाव करणसिंग ग्रोव्हर, बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू यांचे पती आहेत. अभिनेता करण सिंहची पहिली पत्नी टेलीव्हिजन अभिनेत्री श्रद्धा निगम होती, त्याने 2008 मध्ये तिच्याशी लग्न केले होते आणि लग्नाच्या 10 महिन्यांनंतरच त्यांचा घटस्फोट झाला होता.

त्यानंतर त्याने 2012 मध्ये त्याची दुसरी को-स्टार जेनिफर विगेटशी लग्न केले. 2014 मध्ये त्यांचे घटस्फोट झाले. त्यानंतर करणने 2016 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूशी लग्न केले आणि सध्या ते सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.

कमल हसन-दिग्गज अभिनेता आणि राजकारणी कमल हसन ने 1978 मध्ये शास्त्रीय गायक ‘वाणी गुणपती’शी पहिले लग्न केले. या लग्नापासून दोघांनाही मुले नाहीत आणि ते 10 वर्षानंतर विभक्त झाले. त्यानंतर कमल हासनने अभिनेत्री सारिकाशी लग्न केले, ज्याकडून त्याला दोन मुली आहेत. हे लग्नही चालू नव्हते आणि 2004 मध्ये दोघेही विभक्त झाले. त्यानंतर कमल हासन,अभिनेत्री गौतमीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. त्याने गौतमीशी केलेल्या लग्नाची पुष्टी कधीच केली नसली तरी या दोघांनी लग्न केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण 2016 मध्ये ते वेगळे झाले.

नीलिमा अजीम – नीलिमा अजीम या यादीतील एकमेव अभिनेत्री आहे. नीलिमा शाहिद कपूरची आई आहे. त तिचे पहिले पती ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर आहे, त्याच्या बरोबर तीने 1975 मध्ये लग्न केले होते. हे लग्न फार काळ टिकले नाही आणि 1984 मध्ये ते वेगळे झाले. तिचे दुसरे पती राजेश खट्टर आहे व दोघांणी 1990 मध्ये लग्न केले आणि 2001 मध्ये वेगळे झाले,नीलिमाने या लग्नातून ईशान खट्टरला जन्म दिला.नीलिमाचा तिसरा नवरा रजा अली खान होता, हे लग्न देखील फक्त 5 वर्षे (2004-2009) चालले.

अदनान सामी-गायक अदनान सामीनेही तीन वेळा लग्न केले आहे. त्यांची पहिली पत्नी अभिनेत्री झेबा बख्तियार होती, जिच्याशी अदनान सामीन 1993 मध्ये लग्न केले होते. या लग्नापासून त्यांना एक मुलगा आहे, ज्याचे नाव अझान सामी खान आहे. दुसरे म्हणजे, अदनान सामीने 2001 मध्ये दुबईतील मुलगी ‘सबा गलदारी’शी लग्न केले आणि 2004 मध्ये ते विभक्त झाले.त्यानंतर त्याने 2010 मध्ये अफगाण वंशाच्या जर्मन मुलीशी लग्न केले.या लग्नातून अदनानला मुलगी आहे.जीचे नाव मदिना आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.