बॉलिवूडचा अभिनेता किशोर कुमार जितका चांगला अभिनेता आणि गायक होता तितकाच तो रोमँटिक देखील होता.मल्टि टालेन्टेड किशोर कुमारची प्रेमकथा अत्यंत रंजक आहे. किशोर कुमार एकदा नव्हे तर चार वेळा प्रेमात पडला आणि त्याने चार वेळा लग्नही केले.किशोर कुमार जितके आपल्या फिल्मी करिअरसाठी प्रसिद्ध होते, तेवढेच ते आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही नेहमीच चर्चेत होते. किशोर कुमार कोणत्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आणि त्याचे चार विवाह कसे झाले…..जानून घ्या.
किशोर कुमार आणि रूमा गुहा – किशोर कुमारची पहिली पत्नी रुमा गुहा होती. रुमा गुहा उर्फ रुमा घोष बंगाली चित्रपटांमध्ये अभिनय व गायन करायची.किशोर कुमार आणि रूमा गुहा यांचे प्रेम वाढले तेव्हा दोघांनी 1951 साली लग्न केले.लग्नाच्या 8 वर्ष नंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले.बातमीनुसार किशोर कुमार ला रुमाचे चित्रपटात काम करने आवडत नव्हते.हळू हळू दोघांमध्ये वाद वाढु लागले आणि किशोर कुमार ने पहिल्या पत्नी रुमापासून घटस्फोट घेतला
किशोर कुमार आणि मधुबाला – किशोर कुमारने 1960 मध्ये मधुबालाशी लग्न केले. त्यावेळी किशोर कुमार मधुबालाच्या प्रेमावर इतका वेडा झाला होता की त्याने लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता.दिलीप कुमारशी ब्रेकअप झाल्यानंतर मधुबाला किशोर कुमारच्या प्रेमात पडली आणि, किशोर कुमारने पहिल्या पत्नी रुमा गुहाशी घटस्फोट घेतल्यानंतर हे दोघे अनेक चित्रपटात एकत्र दिसले.मधुबाला आणि किशोर कुमार यांची प्रेमकथा ‘चलती का नाम गाडी’ आणि ‘हाफ तिकीट’ या चित्रपटाच्या दरम्यान सुरू झाली.मधुबाला आणि किशोर कुमार यांचे लग्न झाले तेव्हा मधुबाला 27 वर्षांची होती.
27 वर्षीय मधुबालाच्या हृदयात एक छिद्र होते आणि त्यामुळे ती नंतर गंभीर आजारी पडली. लग्नानंतर मधुबाला आणि किशोर कुमार लंडनला गेले, तेथे डॉक्टरांनी सांगितले की मधुबाला फक्त दोन वर्ष जगू शकेल.यानंतर किशोरने तिच्या मामाला आणून, मधुबाला सोडले आणि संगितले की ते आता मधुबालाची काळजी घेऊ शकत नाहीत.
किशोर कुमार बहुधा बाहेरच राहत असत, म्हणून मधुबालाची काळजी घेऊ शकत नव्हते ,परंतु मधुबाला ला अजूनही किशोर कुमारबरोबर राहायची इच्छा होती. किशोर तिच्याकडे दोन महिन्यांतून एकदाच भेटायला जायचा.कदाचित त्याला मधुबालापासून दूर जायचे होते. मधुबालाने आजारपणामुळे वयाच्या 35 व्या वर्षी आपले जीवन सोडले आणि या जगाला निरोप दिला.
किशोर कुमार आणि योगिता बाली – किशोर कुमारची तिसरी पत्नी योगिता बाली होती. किशोर कुमार आणि योगिता बाली यांचे लग्न 1976 मध्ये झाले होते, पण किशोर कुमार चे योगिता बालीशी असलेले नाते फार काळ टिकू शकले नाही.योगिताबरोबरचे त्याचे संबंध अवघ्या दोन वर्षांनंतर तुटले.मिथुन चक्रवर्ती,हे लग्न मोडण्याचे कारण होते.योगिता बाली आणि मिथुन चक्रवर्ती एकमेकांना आवडू लागले.किशोर कुमारशी संबंध तोडल्यानंतर योगिता बालीने पुन्हा एकदा मिथुन चक्रवर्तीशी लग्न केले.
किशोर कुमार आणि लीना चंद्रवरकर-किशोर कुमार च्या चौथ्या लग्नाची कहाणी अत्यंत रंजक आहे.किशोर कुमार आणि लीना चंद्रवरकर यांची भेट 1968 साली ‘मन का मीत’ चित्रपटाच्या सेटवर झाली.लीना एक विधवा होती आणि किशोर कुमारने तीन विवाह केले होते, विशेष म्हणजे किशोर कुमार लीना चंद्रवरकर पेक्षा 21 वर्षे मोठा होता,हे संबंध लीनाच्या वडिलांना मान्य नसले तरी किशोर कुमार आणि लीना चंद्रवरकर यांनी एकमेकांचे हात धरन्या चा निर्णय घेतला. अखेर 1980 मध्ये लीनाने आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन किशोर कुमारशी लग्न केले.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.