बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूला बराच काळ लोटला आहे, पण मृत्यूची गाठ, काय सुटायचे नाव घेत नाहिये. रिया चक्रवर्ती तुरूंगातून सुटून बरेच महिने झाले असून,आता तिच्या वकीलांचे विधान समोर आले आहे. रिया चक्रवर्ती चे वकील सतीश मानेशिंदे यांनी विधानसभेत निवेदन जारी केले होते की, ” एकदा रिया चक्रवर्ती जामिनावर सुटल्यानंतर आम्ही त्या लोकांचा पाठलाग करू.” ज्यांनी तिला अपमानित केले आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर बनावट बातम्या देऊन तिचे मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न केला.”
सीबीआयला यादी देणार असल्याचे सतीश मानेशिंदे यांनी संगितले – टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर खोटे दावे करणार्या लोकांची यादी आम्ही सीबीआयकडे पाठवू. ” ज्यामध्ये सुशांतसिंग राजपूत प्रकरणातील मोबाईल रेकॉर्डिंग आणि बनावट बातम्यांचा समावेश होता. विशेषत: रिया चक्रवर्ती बद्दल. तपासाची दिशाभूल करण्यासाठी त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यासाठी आम्ही सीबीआयला विनंती करू.”
रियाच्या वकिलाचे हे विधान विशेषत: रियाचे शेजारी डिंपल थावाणी यांंच्या साठी होते, त्यांनी असे विधान केले होते की ,कोणीतरी त्यांना सांगितले की सुशांत सिंग 13 जून रोजी रियाला घरी सोडायला आला होता.रविवारी त्यांचे निवेदन सीबीआयने नोंदवले असल्याचे मानेशिंदे म्हणाले.
सुशांतसिंग च्या कुटुंबाचा आरोप – रिया चक्रवर्ती ने सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये काढल्याचा आरोप सुशांतसिंग राजपूतच्या कुटुंबीयांनी केला होता. रियावर सुशांतला इतरांपासून वेगळे करण्याचा आरोप होता आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्ती ला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. तिच्यावर सुशांतला ड्र*ग्स दिल्याचा आरोप होता. 7 ऑक्टोबरला तिची सुटका झाली.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.