टैलेंटेड अभिनेत्रींच्या यादीत,अभिनेत्री सलमा आगाच्या नावाचा देखिल समावेश आहे. सलमा आगा ने नुकताच तिचा 64 वा वाढदिवस साजरी केला आहे. तिचा जन्म 25 ऑक्टोबर 1956 रोजी पाकिस्तानच्या कराचीमध्ये झाला होता, परंतु ती मूळत: ब्रिटीश नागरिक होती. मात्र 2016 मध्ये तिला भारतीय नागरिकत्व मिळाले.
सलमा आगा चे नाना ‘जुगल किशोर’,हे राज कपूर यांचे मामा होते. या अर्थाने सलमाची आई ‘नसरीन आगा’,राज कपूरच्या बहिणीसारखी च होती. राज कपूरने तिला हीना या चित्रपटापासून लॉन्च करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु तिची आजी चित्रपटात काम करण्याच्या विरोधात असल्याचे सलमाने सांगितले होते. नानीने राज कपूर यांना सांगितले की कोणत्याही निर्मात्याने त्यांना चित्रपटासाठी देऊ नये. या कारणास्तव, सलमाला काम मिळविण्यात अडचणी आल्या.
बॉलिवूडमध्ये, सलमा आगा अशी अभिनेत्री होती,जीचे गायकीमुळे करिअर वाढले. तिचा पहिला चित्रपट बी.आर. चोप्राचा ‘निकाह’ होता, या चित्रपटात तिने प्लेबॅक सिंगिंगही केले. त्या गाण्याचे नाव ‘दिल के अरमान आंसुओं में बह गए’ आहेे. या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला प्लेबॅक प्रकारात फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
सलमाच्या म्हणण्यानुसार तिला ‘निकाह’ चित्रपट नशिबाणे मिळाला. एका गाण्याच्या संदर्भात ती नौशाद साहेबांच्या घरी पोहोचली. इथेच त्यांची भेट बी आर चोप्राशी झाली होती, जो त्यावेळी ‘तला-क तला-क तला-क’ हा चित्रपट बनवत होते. चोप्रा साहेबांना सलमाचा आवाज आवडला आणि तिला चित्रपटाची ऑफर मिळाली. वादानंतर या चित्रपटाचे नाव बदलून ‘निकाह’ करण्यात आले.
निकाहानंतर सलमाने “कसम पैदा करने वाले की, ऊंचे लोग, जंगल की बेटी “,सारख्या चित्रपटांमध्ये काम केले पण निकाह चित्रपटासारखे यश तिला मिळू शकले नाही. यामागील कारण म्हणजे सलमाचा विश्वास असा होता की, तिला चित्रपटांची निवड योग्य प्रकारे कर्ता आली नये. शेवटच्या वेळी सलमा 1996 मध्ये आलेल्या ”गहरा राज’ या चित्रपटात दिसली होती.
सलमाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना, सल्माने पहिले जावेद शेखशी 1980 मध्ये लग्न केले पण त्यांचे संबंध फार काळ टिकू शकले नाहीत. त्यानंतर सलमानने तिचे दुसरे लग्न 1989 मध्ये रहमत खानशी केले, पण हे संबंधही तुटले आणि त्यानंतर तिचे तिसरं लग्न मंजर शाहशी झालं. त्यांना दोन मुले, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.