‘किंग ऑफ बॉलिवूड’ पुस्तकात अनुपमा चोप्राने शाहरुख आणि गौरीबद्दल काही रंजक गोष्टी सांगितल्या आहेत.ह्या पुस्तकात लिहिले आहे की गौरीच्या वडिलांना शाहरुखच्या धर्माशी नव्हे तर अभिनयामुळे अडचण होती. गौरीच्या आईला कदाचित शाहरुखला पडद्यावर पाहणे आवडले असेल, परंतु त्यांना जावई म्हणून पहायचे नव्हते.
त्यांच्यातील नातं कसे फोडायचे या साठी गौरीच्या आईने ज्योतिषीचा सल्ला घेतला पण काही उपयोग झाला नाही. त्याचवेळी गौरीचा भाऊ विक्रांतलाही आपल्या बहिणीचे शाहरुखशी असलेले नाते आवडले नाही.विक्रांतने बंदुकीने शाहरुखला भीती दाखावली.
शाहरुख आणि गौरीने 25 ऑक्टोबर 1991 रोजी लग्न केले होते. ही जोडी बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडींपैकी एक आहे.काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान गौरीने लॉकडाऊन दरम्यान शाहरुख खान स्वयंपाक करत असल्याचे उघड केले. ती म्हणाले होती, ‘लॉकडाऊन दरम्यान आम्ही सर्वजण बाहेर जेवणाची ऑर्डर देण्यास घाबरत होतो, त्यामुळे शाहरुख घरचे जेवण स्वतः च बनवायचे.
गौरीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘मी एक महिला आहे. मी संरक्षक, फिरनारी ,स्वप्न पाहणारी आणि यशस्वी स्त्री आहे, परंतु तुम्हाला माझा फक्त एक च भाग दिसतो. माझ्या भूमिकेत न दिसणारा तो भाग, माझ्या आत्म्यात कैद केलेला आहे. जो भाग दिसत नाही तोच मला परिपूर्ण करतो आणि हा च भाग मला सामर्थ्य देतो. ‘
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.