बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री वैजयंती माला चा जन्म 13 ऑगस्ट 1936 रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता. या महान अभिनेत्रीने वयाच्या 13 व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली होती.तीच्या सौंदर्य आणि निरागसतेमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली. वैजयंती माला ने केवळ दक्षिण भारतात नव्हे तर हिंदी चित्रपटांवरही राज्य केले.
तिचे मोठे आणि सुंदर डोळे, शांत आणि आनंदी स्मित चेहरा ज्याने सरवान्ना वेड लावले. बॉलिवूडपासून टॉलीवूडपर्यंत तिने, एक उत्तम अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये दक्षिण भारतीय अभिनेत्रींना वेगळी ओळख मिळवून देणारी अभिनेत्री म्हणून ती मानली जाते.
1951 मध्ये वैजयंती मालाने बॉलिवूड मधे काम करन्यास सुरुवात केली, तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट ‘बहार’ होता. त्यानंतर 1954 मध्ये रिलीज झालेला ‘नागीन’ हा चित्रपट वैजयंती मालाच्या सिने कारकीर्दीचा पहिला सुपरहिट चित्रपट ठरला. यानंतर तिने ‘देवदास’, ‘साधना’, ‘मधुमती’, ‘गंगा-जमुना’, ‘संगम’, ‘संघर्ष’ असे अनेक चित्रपट केले. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
शरद चंद्रच्या ‘देवदास’ कादंबरीत वजयंती माला ने चंद्रमुखीची भूमिका केली होती आणि त्यामध्ये तिचे खूप कौतुक झाले. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्याच वेळी 1958 च्या ‘साधना’ या चित्रपटात वैजयंती माला ला तिच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
चित्रपटात तिचा अभिनय खूप दमदार होता. ‘मधुमती’ हा चित्रपट पुनर्जन्मवर आधारित होता. या चित्रपटात वैजयंती माला हिने तिहेरी भूमिका साकारली होती. या मुळे प्रेक्षक तिचे चाहते झाले. वैजयंतीने तिहेरी भूमिका साकारून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. तथापि, तिला केवळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते.
‘संगम’ हा चित्रपट 1964 मध्ये प्रदर्शित झाला होता. राज कपूर निर्मित ‘संगम’ चित्रपट हा प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित आहे. या चित्रपटात ती राज कपूर आणि राजेंद्र कुमार यांच्याबरोबर होती, तसेच तीचे आणि राज कपूरचे अफेअर इथूनच सुरू झाले होते.या चित्रपटात वैजयंतीला तिच्या उत्तम अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
वैजयंती मालाने आपल्या कारकीर्दीत दिलीप कुमार, राज कपूर, देवानंद, राजेंद्र कुमार, सुनील दत्त या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. जरी त्यांची जोडी सर्वात जास्त पसंती राजेंद्र कुमारसोबत होती, परंतु दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्यासोबत तीच्या रिलेशनशिपच्या जोडी तयार केल्या गेल्या. 2007 मध्ये वैजयंती माला यांनी ‘बाँडिंग’ हे आत्मचरित्र देखील लिहिले होते ज्यात तिने तिच्या दोन्ही सह-कलाकारांशी कोणतेही संबंध नसल्याचे संगितले.
1968 मध्ये वैजयंती मालाने ‘चमनलाल बालीशी’ लग्न केले. यानंतर तिने चित्रपटात काम करणे सोडले.वैजयंती माला नी ही राजकारणातील आपली सक्रियता दाखवली. प्रथम तिने तामिळनाडूच्या सामान्य निवडणुकीत भाग घेतला. ती कॉंग्रेसमध्ये होती. 1999 मध्ये तिने कॉंग्रेस पक्षात राजीनामा देउन, भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. वैजयंती माला हिने हिंदीव्यतिरिक्त तेलगू, तामिळ आणि बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
अशाच मनोरंजक बातम्यांसाठी आत्ताच लाईक बटन दाबा!!