हुबेहूब आपल्या आईसारखेच दिसतात या कलाकारांचे मुले, आहेत पूर्णपणे कार्बन कॉपी!!

सोशल मीडियावर आजकाल कलाकारांच्या मुलांचे छायाचित्रे हे खूप व्हायरल होत आहेत आणि या कलाकार मुलांचे चेहरे हुबेहूब आपल्या आईसोबत मिळतात. हे कलाकारांचे मुले आपल्या आईची प्रत वाटतात आणि त्यांना पाहून कोणी पण हे अगदी सहजपणे सांगू शकतात की हे कोणत्या अभिनेत्रीचे मुले आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशा पाच कलाकारांच्या मुलांचे छायाचित्रे दाखवणार आहोत ज्यांना पाहून तुम्हाला असे वाटेल की ते पूर्णपणे आपल्या आईसारखे आहे आणि या अभिनेत्री लहानपणी आपल्या मुलांसारखीच दिसत होती.

सारा अली खान आणि अमृता सिंह- सारा अली खान ही अभिनेत्री अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची मुलगी आहे. सारा अली खान देखील आपल्या आईसारखी एक लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे आणि सारा हुबेहूब अमृता सिंह सारखी दिसते. सारा अली खानला पाहिले नजरेत पाहून आपल्याला हेच वाटते की आपण अमृता सिंह यांना पाहत आहोत.

अमृता सिंह आणि सारा अली खान यांच्यात बरेच काही साम्य देखील आहे. सारा अली खानने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘ केदारनाथ ‘ या चित्रपटापासून केली होती. हा चित्रपट हिट ठरला होता. तेच अमृता सिंह यांचा पहिला चित्रपट ‘ बेताब ‘ हा होता आणि अमृता सिंहचा देखील पहिला चित्रपट हिट ठरला होता.

ऐश्वर्या आणि आराध्या- जर ऐश्वर्या आणि आराध्या यांचे छायाचित्र सोबत ठेवले तर पहिल्या नजरेत तुम्हाला दोन्ही छायाचित्रात एकच व्यक्ती वाटेल. आराध्या पूर्णपणे आपली आई ऐश्वर्यावर गेली आहे आणि आराध्याला पाहून तुम्हाला हेच वाटेल की तुम्ही ऐश्वर्याच्या लहानपणाचे रुप बघत आहात.

करीना कपूर आणि तैमूर खान- तैमूर खानला सर्वात गोड स्टारकिड मानले जाते. तैमूर खान दिसायला खूप सुंदर आहे आणि त्याची एक झलक बघण्यासाठी खूप सारे लोक सैफ आणि करीना यांच्या घरासमोर उभे राहतात. तैमूरला हा गोडपणा दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडून नसून आपली आई करीनाकडून मिळाला आहे. करीना कपूर लहानपणी तैमूर सारखीच दिसत होती आणि या दोघांचे लहानपणाचे छायाचित्र देखील एकसारखेच वाटते.

ट्विंकल खन्ना आणि नीतारा- अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्ना यांची नीतारा आता सात वर्षांची झाली आहे आणि नीताराला बघून तुम्हाला ट्विंकल खन्नाची आठवण येईल. कारण नीतारा एकदम हुबेहूब ट्विंकल खन्ना सारखीच दिसते. एवढेच नाही तर नीताराचा चेहरा हा आजी डिंपल कापडिया यांच्याशी देखील जुळतो. नीतारा आणि ट्विंकल खन्ना यांचे लहानपणीचे छायाचित्र पाहून तुम्हाला देखील हेच वाटेल की नीतारा आपली आई ट्विंकल खन्नाची प्रत आहे आणि आपल्या आजी सारखी देखील दिसते.

काजोल आणि युग- काजोल आणि अजय देवगण यांना एकूण दोन मुले आहेत आणि त्यांचा लहान मुलगा युग हा पूर्णपणे काजोलची प्रत आहे. युग हा अगदी तसाच वाटतो जशी काजोल आपल्या लहानपणी वाटायची. युगचे वय 9 वर्ष एवढे आहे आणि बऱ्याचदा युगला काजोल आणि अजय देवगण यांच्यासोबत टिपले गेले आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.