लग्नाचे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असते. आयुष्यात एक वळण असे येते जेव्हा व्यक्तीला लग्न करावे लागते. विशेषत: मुलींचे लग्न हे अगदी कमी वयात केले जाते. भारतीय पालकांचे असे म्हणणे असते की मुलगी जेवढ्या लवकर सेटल होऊन जाईल तेवढे चांगले असते.
बॉलिवूड काही अशा अभिनेत्री उपस्थित आहेत ज्यांच्या लग्नाचे वय तर निघून गेले आहे परंतु आज देखील त्या अविवाहित आहेत. कदाचित खरे प्रेम मिळाले नाही म्हणून अजून त्यांनी लग्न केले नसेल. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला चित्रपटसृष्टीतील 5 अशा अभिनेत्रीया भेटवणार आहोत, ज्या खऱ्या प्रेमाच्या शोधात आतापर्यंत अविवाहित राहिल्या आहेत.
परवीन बॉबी- परवीन बॉबी ही 70-80 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री होती. परवीन बॉबीचे नाव हे अनेक लोकांसोबत जोडले गेले परंतु तिने कधीच कोणाशी लग्न नाही केले. अहवालानुसार, तिचे महेश भट्ट वर खूप प्रेम होते. परंतु आधीच विवाहित असल्या कारणामुळे ते तिच्यासोबत लग्न करू शकत नव्हते. यामुळे परवीन अविवाहित राहिली.
तब्बू- माध्यमांच्या अहवालानुसार तब्बूचा साखरपुडा हा साजिद नाडियाडवाला सोबत झाला होता. तथापि या बातमीचे सत्य तर नाही माहित परंतु 45 व्या वर्षात आज देखील तब्बू अविवाहित आहे. साजिद नाडियाडवाला हे एक चित्रपट निर्माते आहेत. बातम्या तर ह्या पण आल्या की तब्बू बॉलिवूड मधील सिंघम म्हणजे अजय देवगणच्या प्रेमात बंधिस्त होती परंतु काजोलमुळे अजयने तब्बूला सोडून दिले आणि याच कारणामुळे तब्बूने कधीच लग्न नाही केले.
सुष्मिता सेन- माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन 43 व्या वर्षात आज देखील अविवाहित आहे. ती आपल्या दोन दत्तक घेतलेल्या मुलींसोबत राहते. तथापि, या दिवसात ती आपल्या पेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या मॉडेल रोहन शाहला डेट करत आहे आणि माध्यमांच्या म्हणण्यानुसार दोघे लवकरच लग्न देखील करू शकतात. आता अशात हे बघणे मनोरंजक ठरेल की येणाऱ्या काळात ती रोहमन सोबत लग्न करते की नाही.
सुरैया- सुरैया आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका होती. एके काळी अभिनेत्री सुरैया आणि देवानंद यांच्या प्रेमाचे किस्से हे खूप प्रसिद्ध होत होते. माध्यमांच्या अहवालानुसार, सुरैया यांच्या आजी ह्या देवानंद यांना पसंत नव्हत्या ज्याकारणामुळे त्यांचे लग्न नाही झाले आणि त्या अशाच अविवाहित राहिल्या. ‘ जीत ‘ चित्रपटाच्या सेटवर देवानंद यांनी सुरैयाला हिऱ्याची अंगठी देऊन मागणी देखील घातली होती.
अमिषा पटेल- अमिषा पटेलने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात सन 2000 मध्ये सुपरहिट चित्रपट ‘ कहो ना प्यार हैं ‘ पासून केली होती. यानंतर ती अजून एक सुपरहिट चित्रपट ‘ गदर – एक प्रेम कथा ‘ मध्ये देखील दिसली होती. परंतु यांनतर तिच्या कारकीर्दीचा ग्राफ हा खालीच येत राहिला.
आज अमिषाचे वय हे 40 च्या पार गेले आहे तरी देखील ती अविवाहित आहे. अमिषा विवाहित दिग्दर्शक विक्रम भट्ट सोबत आपल्या अफेयर बद्दल काही काळ चर्चेत राहिली होती.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.