या अभिनेत्याने केले होते वयाच्या 70 व्या वर्षी चौथे लग्न,पत्नीपेक्षा वयाने मोठी आहे मुलगी!!

बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी जेवढे आपल्या अभिनयासाठी ओळखले जातात तेवढेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा चर्चेत राहतात. भारतील सिनेमांमधील बऱ्याच चित्रपटात कबीर बेदी यांनी काम करून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आपली चांगली पकड बनवली आहे. तेच पनी अभिनयापेक्षा अभिनेत्रींसोबतच्या नात्यांमध्ये चर्चेत राहिले, कबीर बेदी यांनी आपल्या आयुष्यात 4 लग्न केले आहेत.

कबीर बेदी यांचा 16 जानेवारी रोजी वाढदिवस असतो, 70 वर्षे पूर्ण केलेले कबीर बेदी अनेक वेळा अभिनेत्रींसोबतच्या नातेसंबंधामुळे चर्चेत आले आहेत. आतापर्यंत त्यांनी 4 लग्न केले आहेत.

त्यांची चौथी पत्नी परवीन दुसांज त्यांच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान आहे. कबीर यांनी परवीन सोबत त्यांच्या 70 व्या वाढदिवसाला लग्न केले होते ज्यांना त्यांनी 10 वर्षांपासून डेट केले होते.माध्यमांच्या वृत्तानुसार, परवीन आणि कबीर हे जवळचे मित्र होते आणि 10 वर्षांपर्यंत अफेयर होते. कबीर यांनी आपल्या 70 व्या वाढदिवसाला 2016 साली परवीन सोबत लग्न केले होते.

परवीन मॉडेल आणि अभिनेत्री शिवाय दूरदर्शन निर्माती देखील आहे. लग्नाच्या आधी परवीन अनेक वर्ष कबीर सोबत लिव इन मध्ये राहत होती.याच्या आधी कबीर बेदी यांनी आपले पहिले लग्न हे प्रतिमा बेदी सोबत केले होते ज्यांची मुलगी पूजा बेदी ही आहे जी आपल्या वडिलांच्या चौथ्या पत्निपेक्षा फक्त 4 वर्षांनी लहान आहे.

आपल्या पहिल्या पत्नीशी नाते खराब झाल्या कारणाने कबीर त्यांच्याशी वेगळे झाले होते. ज्यानंतर त्यांनी ब्रिटिश फॅशन डिझायनर सुसैन हम्फ्रेस सोबत लग्न केले.तथापि हे लग्न काही काळानंतर नाही चालले आणि 1990 मध्ये त्यांनी साली तिसरे लग्न दूरदर्शन आणि रेडिओ प्रेजेंटर निक्की सोबत केले. हे नाते 15 वर्षांपर्यंत चालले, ज्यानंतर 2005 मध्ये दोघे वेगळे झाले आणि कबीर बेदी यांनी चौथे लग्न परवीन दुसांज सोबत केले.

कबीर आणि परवीन यांची पहिली भेट ही लंडन मध्ये झाली होती. कबीर सोबत लग्नासाठी घरातले राजी नव्हते परंतु नंतर सगळे मानून गेले. परवीन आणि कबीरचे लग्न गुरुद्वारेत झाले होते. इथे दोघांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि नातेवाईक सामील झाले होते.

लग्नामध्ये कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदी या लग्नाबद्दल नाराज होती. यागोष्टी वरून पुजाने द्वेष सुद्धा व्यक्त केला होता. जेव्हा कबीरने परवीन सोबत लग्न केले होते तर त्यांनी ट्विट वर आपली नाराजी व्यक्त केली होती आणि परवीन ला चेटकीण म्हणले होते. परवीन अभिनेत्री आणि मॉडेल शिवाय दूरदर्शन निर्माती सुद्धा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.