कतरिना कैफपासून रेखापर्यंत या बॉलिवूड अभिनेत्रींनी आपले नाव बदलून केली आहे बॉलिवूड मध्ये कमाई!!

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी चित्रपटात येण्यापूर्वी आपले नाव बदल्ले आहे.अक्षय कुमारचे खरे नाव राजीव हरिओम भाटिया आहे.टायगर श्रॉफचे नाव जय हेमंत श्रॉफ आहे,आणि रजनीकांत यांचे नाव शिवाजीराव गायकवाड होते. केवळ अभिनेतेच नाही, तर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी चित्रपटांत प्रवेश करण्यापूर्वी त्यांची नावे बदलली.

कियारा अडवाणीने अल्पावधी काळातच इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.सलमान खानच्या सल्ल्यानुसार तिने आपले नाव बदलल्याचे,कियाराने उघड केले होते. वास्तविक कियाराचे खरे नाव आलिया आडवाणी आहे. कियारा डेब्यू करण्याची तयारी करत असताना आलिया भट्टने इंडस्ट्रीत नाव कमावले होते. हेच नाव असल्यामुळे, कियाराने तिचे नाव बदलले.

कतरिना कैफचे खरे नाव कतरिना टरकोटे आहे. तिच्या आईचे आडनाव टरकोटे आहे. तिच्या वडिलांचे नाव मोहम्मद कैफ आहे. जेव्हा कतरिना लहान होती, तेव्हा तिचे पालक विभक्त झाले आहेत.

रेखाचे खरे नाव म्हणजे भानुरेखा गणेशन. चित्रपटांमध्ये आल्यानंतर तिने आपले नाव बदलून फक्त रेखा ठेवले.शिल्पा शेट्टी चे नाव अश्विनी शेट्टी होते. नंतर ज्योतिषाच्या सांगण्यावरून तिच्या आईने तिचे नाव शिल्पा शेट्टी असे ठेवले.

मधुबालाच्या वडिलांचे नाव अताउल्लाह आणि आईचे नाव आयशा बेगम आहे. जन्माच्या वेळी वडिलांनी त्यांचे नाव मुमताज जहां देहलवी ठेवले. 1942 मध्ये मुमताजचा पहिला चित्रपट ‘बसंत’ प्रदर्शीत झाला होता. तिचा अभिनय पाहून प्रसिद्ध अभिनेत्री देविका राणीने ,तिला आपले नाव बदलण्याचा सल्ला दिला. देविका राणीने तिचे नवे नाव मधुबाला ठेवले.

करणजित कौर वोहरा असे सनी लिओनीचे नाव आहे. एडल्ट इंडस्ट्री मधे गेल्यावर तिला आपले नाव बदलावे लागले. लियोनी आडनावाबद्दल, सनीने सांगितले होते की तिने आपले नाव सिंहापासून ठेवले आहेे.श्रीदेवी, जीने बर्‍याच वर्षांपासून इंडस्ट्रीवर राज्य केले, तिचे नाव श्री अम्मा यंगर अयप्पन होते. चित्रपटात दिसल्यानंतर तिच्या आईने तिचे नाव बदलले.

Leave a Reply

Your email address will not be published.