या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या पत्नी आहेत खूप सुंदर,नेहमीच राहतात लाइमलाइट पासून दूर

बॉलिवुडचे जग हे असे आहे की जिथे तुमच्यासोबत तुमचे कुटुंब देखील लोकप्रिय होते. विशेषत: जर तुम्ही यशस्वी अभिनेते असाल तर लोक तुमच्याशिवाय तुमच्या पत्नीचा चेहरा व नाव चांगले लक्षात ठेवतात. उदाहरणार्थ शाहरुख खान ची पत्नी गौरी किंवा शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत ला सगळेच ओळखतात.

तथापि, आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड मधील त्या नामांकित अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या बायका तुम्ही यापूर्वी क्वचितच पहिल्या असतील. या कलाकारांच्या बायका लाइमलाइट पासून नेहमी दूर राहतात. लोक त्यांना फारच कमी जाणतात व ओळखतात. तसे, यापैकी बहुतेक बायका या त्यांच्या पतीपेक्षा अधिक सुंदर दिसतात.

बोमन इराणी आणि जेनोबिया इराणी: बोमन इराणी हे बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते बऱ्याचदा आपल्या चित्रपटात चांगल्या कॉमिक टाइमिंग साठी ओळखले जातात. बोमन यांच्या पत्नीचे नाव जेनोबिया इराणी आहे. या दोघांचे लग्न 1985 साली झाले होते. जेनोबिया बऱ्याचदा माध्यमांच्या टाइमलाइट पासून दूर राहतात. हेच कारण आहे की खूप कमी लोक त्यांना ओळखतात.

जावेद जाफरी आणि जेबा बख्तियार – हबीबा जाफरी: जावेद जाफरी हे बॉलिवूड मध्ये आपल्या विनोदी भूमिकेसाठी ओळखले जातात. जावेद यांनी पाहिले लग्न 1989 साली 80 व्या दशकातील सुंदर अभिनेत्री जेबा बख्तियार सोबत केले होते.

मात्र, एक वर्षातच दोघांमध्ये घटस्फोट झाला होता. यानंतर जावेद जाफरी यांचे मन हबीबा जाफरी वर आले आणि त्यांनी तिच्यासोबत दुसरे लग्न केले. जावेद यांच्या दोन्ही बायका सौंदर्याच्या बाबतीत खूप चांगल्या आहेत.

नाना पाटेकर आणि निलकांती पाटेकर: नाना पाटेकर जरी दिसण्यात सुंदर नसतील पण त्यांच्या पत्नी निलकांती पाटेकर या खूप सुंदर आहेत. दोघांचे लग्न 1978 साली झाले होते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना नानांच्या पत्नी बद्दल माहिती नसेल कारण त्यांनी मुलाच्या जन्मानंतर लगेच आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. सध्या नाना आपल्या एकुलता एक मुलगा आणि आई सोबत राहत आहेत.

जॉनी लिवर आणि सुजाता लिवर: बॉलिवूड मध्ये नेहमी विनोदी भूमिका साकारणारे जॉनी लिवर यांच्या पत्नीचे नाव सुजाता लिवर हे आहे. यादोघांचे लग्न 1984 साली झाले होते. दोघांना एक मुलगा व एक मुलगी आहे. लूकच्या बाबतीत सुजाता जॉनी पेक्षा खूप सुंदर आहे.

गुलशन ग्रोवर आणि कशिश – फिलोमिना: गुलशन ग्रोवर हे बॉलिवूड मध्ये खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जातात. गुलशन यांच्या दोन बायका आहेत आणि दोघींसोबत त्यांचा घटस्फोट झाला आहे. गुलशन ग्रोवर यांनी 1998 साली फिलोमिना ग्रोवर नावाच्या महिलेशी लग्न केले होते.

परंतु दोघांच्या वैयक्तिक कारणांमुळे त्यांचा घटस्फोट झाला होता. गुलशन ग्रोवर यांची दुसरी पत्नी कशिश ग्रोवर आहे, जिच्यासोबत लग्न 2001 मध्ये व घटस्फोट 2002 मध्ये झाला होता. गुलशन यांची पहिली व दुसरी या दोन्ही पत्नी सुंदर आहेत.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.