बॉलीवूड फिल्मी जगतामध्ये अनेक कलाकारांच्या जोड्या बनतात तर अनेक जोड्या तुटतात. आज आपण बॉलीवूडच्या पाच कलाकारांच्या पहिल्या पत्नींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही. कदाचित तुम्ही त्यांना कधीच पाहिले नसेल. चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्यांच्या पत्नींबद्दल.
धर्मेंद्र आणि प्रकाश कौर- बॉलीवूड फिल्मी जगतातील हीमॅन अभिनेता धर्मेंद्र ८० च्या दशकामध्ये बॉलीवूडमधील सुपरस्टार बनले होते आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे ज्यांच्यापासून धर्मेंद्र यांना सनी देओल आणि बॉबी देओल हि दोन मुले आणि दोन मुली आहेत. पण धर्मेंद्रचे हृदय हेमा मालिनीवर आले होते आणि त्यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केले पण त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला कधीच नाही सोडले.
कमल हसन आणि वाणी गणपति- बॉलीवूड आणि साउथचा प्रसिद्ध अभिनेता कमल हसनने दोन लग्न केले आहेत आणि वाणी गणपति कमल हसनची पहिली पत्नी होती. कमल हसन आणि वाणी गणपतीने १९७८ मध्ये लग्न केले होते. पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि १९८८ मध्ये दोघे घटस्फोट घेऊन वेगळे झाले.
संजय दत्त आणि रिचा शर्मा- बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा होती आणि दोघांनी १९८७ मध्ये लग्न केले होते तथापि फक्त ९ वर्षानंतर ऋचा शर्माचा ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू झाला होता आणि त्यानंतर संजय दत्तने दुसरे आणि तिसरे लग्न केले आता त्याच्या पत्नीचे नाव मान्यता दत्त आहे जी वयाने त्याच्यापेक्षा खूपच लहान आहे आणि खूप सुंदर देखील आहे.
आमिर खान आणि रीना दत्त- बॉलीवूडचा परफेक्टनिस्ट अभिनेता आमिर खानने आपल्या लहानपणीची दोस्त रीना दत्तासोबत लग्न केले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि घरच्यांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी लग्न केले होते.
दुर्देवाने १६ वर्षानंतर दोघे घटस्फोट घेऊन वेगळे झाले. आमिर खानला रीना दत्तपासून दोन मुले आहेत एक मुलगी इरा खान आणि मुलगा जुनैद खान.
करण सिंह ग्रोवर आणि श्रद्धा निगम – टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेता कारण सिंह ग्रोवरने अभिनेत्री बिपाशा बसूसोबत तिसरे लग्न केले आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव श्रद्धा निगम होते. पण काही वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला.
श्रद्धा निगम एक टीव्ही अभिनेत्री आहे. श्रद्धा निगमला घटस्फोट दिल्यानंतर करण सिंह ग्रोवरने जेनिफर विंगेटसोबत लग्न केले आणि नंतर तिला घटस्फोट देऊन बिपाशासोबत लग्न केले. आज त्यांना एक मुलगी आहे.
अशाच मनोरंजक बातम्यांसाठी आत्ताच लाईक बटन दाबा!!