या १० लोकप्रिय बॉलिवूड कलाकारांना तर तुम्ही ओळखताच,ही आहेत प्रसिद्धी पासून लांब असलेली त्यांची मुले!!

बॉलिवूड चित्रपटात विनोदाचा तडका लावला जातो. यामुळे प्रेक्षक चित्रपटांमध्ये बोर नाही होत. बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्गज आहेत ज्यांच्यासाठी विनोद हे डाव्या हाताचे काम आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला लोकप्रिय विनोदी अभिनेत्यांच्या मुलांशी भेटवणार आहोत.

आरव कुमार ( अक्षयकुमारचा मुलगा ): अक्षय हे बहुगुणसंपन्न अभिनेते आहेत. आपल्या उत्कृष्ट विनोदाने ते लोकांना खूप हसवतात. त्यांच्या मुलाला माध्यमांच्या लाइमलाइट पासून दूर रहायला आवडते. तो कॅमेऱ्यापासून एवढा लाजतो की माध्यमांपासून लपण्यासाठी मुख्यत: हुडी व टोपी घालूनच बाहेर निघतो. सध्यातरी आरवला चित्रपटसृष्टीत काहीच रस नाही आहे.

कायज इराणी ( बोमन इराणीचा मुलगा ): 30 वर्षानंतर बॉलिवूड मध्ये आपली कारकीर्द बनवणारे बोमन इराणी आपल्या अफलातून अभिनयासाठी ओळखले जातात. ते चित्रपटात मुख्यतः विनोदी भूमिका साकारतात. बोमनचा मुलगा देखील एक अभिनेता आहे. कायाजला तुम्ही ‘ स्टूडेंट ऑफ द इअर ‘ मध्ये पाहिले आहे. त्यांनी अन्य बरेच काही चित्रपट केले आहेत परंतु त्यांची काही एवढी खास फॅन फॉलोविंग नाही आहे.

यशवर्धन आहुजा ( गोविंदाचा मुलगा ): 20 वर्षीय यशवर्धनची तुलना नेहमी त्याचे वडील गोविंदाशी केली जाते. यशवर्धनने लंडन मधून चित्रपट निर्मितीचा देखील कोर्स केला आहे. तो चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत कॅमेऱ्याच्या मागून काम करत आहे. कॅमेऱ्याच्या समोर येऊन अभिनय करण्याचा त्याचा काहीच हेतू नाही आहे.

आदित्य रावल ( परेश रावलचा मुलगा ): परेश रावल यांना बॉलिवूड मधील उत्कृष्ट अभिनेते मानले जाते. ते विनोदापासून नाटकापर्यंत सर्व अभिनय व्यवस्थित जाणतात. परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल ने बॉम्बे टॉकीज चित्रपटापासून अभिनयाला सुरुवात केली होती. तथापि वर्तमानात तो अभिनयापेक्षा चित्रपट लेखन करणे पसंत करतो. उदाहरणार्थ आदित्यने ‘ ओमएमजी : ओह माय गॉड ‘ चित्रपटाचा स्क्रीनप्ले लिहिला होता.

सरफराज खान ( कादर खानचा मुलगा ): स्वर्गीय कादर खान हे 90 च्या दशकात अनेक विनोदी भूमिका साकारत होते. त्यांचा मुलगा सरफराज देखील चित्रपटांमध्ये दिसल्या जातो. तुम्ही त्याला वॉन्टेड आणि तेरे नाम सारख्या चित्रपटात पाहिले आहे.

जस्सी लिवर ( जॉनी लिवरचा मुलगा ): नेहमी आपल्या विनोदी भूमिकेसाठी लोकप्रिय असणाऱ्या जॉनी लिवर यांच्या मुलाने देखील अभिनयामध्ये हात आजमावून पहिला आहे. कभी खुशी कभी गम मध्ये जस्सीने बालकलाकार म्हणून काम केले होते. मोठा झाल्यावर तो ‘ वॉर ‘ चित्रपटात देखील छोट्या भूमिकेत दिसला होता.

लकी अली ( महमूदचा मुलगा ): जेव्हापण बॉलिवूड मध्ये विनोदी काम करणाऱ्या दिग्गज अभिनेत्यांचे नाव घेतले जाते तेव्हा त्या यादीमध्ये महमूद हे पहिल्या क्रमांकावर येतात. तथापि त्यांच्या मुलाने अभिनय क्षेत्र सोडून संगीत क्षेत्र निवडले आहे. लकी अली चे बरेच गाणे हे 90 च्या दशकात लोकप्रिय झाले होते.

जसराज भट्टी ( जसपाल भट्टींचा मुलगा ): पंजाब आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदाने सर्वांना हसवणारे जसपाल भट्टी यांचे एका कार अपघातात निधन झाले होते. जसराज भट्टी त्यांचाच मुलगा आहे जो ‘ पॉवर कट ‘ चित्रपटात वडिलांसोबत दिसला होता.

अनिकेत सराफ ( अशोक सराफ यांचा मुलगा ): अनिकेत ‘ हम पाच ‘ या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले विनोदी अभिनेते अशोक सराफ यांचा मुलगा आहे. अनिकेतला माध्यमांच्या लाइमलाइट लांब राहायला आवडते.

बबलु मुखर्जी ( केश्तो मुखर्जी यांचा मुलगा ): केश्तो मुखर्जी हे नेहमी चित्रपटात बेवड्याच्या भूमिकेतच दिसत होते. ते त्यांच्या काळातील उत्कृष्ट दिग्दर्शक होते. त्यांचा मुलगा बबलु आपल्या वडिलांसारखा नाव नाही कमवू शकला. बबलुला तुम्ही दिलं आणि इसी का नाम जिंदगी सारख्या चित्रपटात पाहिले आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.