जरी लॉकडाऊन मुळे चित्रपटाचे चित्रीकरण बंद असले, तरी बॉलिवूड अभिनेते हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडलेले आहेत. बॉलिवूड आणि दूरदर्शन वरील कलाकार सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओज शेअर करतच असतात.
यासोबतच यांच्याशी संबंधित काही किस्से आणि व्हिडिओज देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. हल्लीच धर्मेंद्र यांची मोठी सून पूजा देओलचा फोटो देखील सोशल मीडियावर खूप शेअर होत आहे. पूजा ही सनी देओल यांची पत्नी आहे, परंतु ती लाइमटाइमपासून खूप दूर राहते. अशा परिस्थितीत पूजाचे जास्त फोटो समोर येत नाहीत.
सनी देओल यांची पत्नी पूजा आणि धर्मेंद्र यांची मोठी सून दिसायला खूप सुंदर आहे. पूजाचे फोटो पाहून तुम्हाला देखील वाटेल की पूजा दिसायला अभिनेत्रींपेक्षा कमी नाही आहे. पूजा ही लाइमटाइमपासून दूर राहते, परंतु हल्लीच ती आपल्या मुलासोबत दिसली होती.
खरतर करणचा पहिला चित्रपट पल पल दिल के पास चा प्रीमियर ठेवला होता ज्यामुळे पूजा आपल्या कुटुंबासोबत यामध्ये सामील झाली होती. याचदरम्यान पूजाचा हे फोटोज् खूप व्हायरल झाले होते.
विशेष म्हणजे सनी देओलने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटात जबरदस्त ओळख बनवली. चित्रपटांमुळे ते चाहत्यांना पसंत आहेत तसेच ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेले आहेत.
तथापि सनी आपली पत्नी पूजा सोबतचे खूपच कमी फोटो शेअर करत असतात. असा म्हणले जाते की सनी यांना आपले वैयक्तिक आयुष्य कोणासोबत पण शेअर करायला आवडत नाही. पूजा आणि सनीच्या लग्नाची बातमी बऱ्याच काळापर्यंत मध्यामांपासून लपलेली होती.
खरतर सनीने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधीच 1984 मध्ये पूजा सोबत लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला आता 36 वर्ष पूर्ण झाले आहेत. जेव्हा सनी हे पडद्यावर आले होते तेव्हा कोणालाच याबद्दल माहिती नव्हती की ते विवाहित आहेत.
अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नी बद्दल समजताच ते आश्चर्यचकित झाले. लग्नाची बातमी समोर आल्यानंतर देखील माध्यमांसमोर पूजा जास्त आली नाही.
हल्लीच जेव्हा पूजाचा फोटो चर्चेमध्ये आला जेव्हा तिचा मुलगा आणि अभिनेता करण देओल ने मातृदिनाच्या निमित्ताने तिच्यासोबत आपल्या लहानपणाचा फोटो शेअर केला. आश्चर्याची गोष्ट आहे की स्वतः धर्मेंद्र यांनी माध्यामांपासून सनीच्या लग्नाची गोष्ट लपवली होती.
खरतर सनीचा चित्रपट बेताब हा प्रदर्शित होणार होता. त्यावेळी धर्मेंद्र यांना भीती होती की जर सनीच्या लग्नाची गोष्ट समोर आली तर त्यांची रोमँटिक प्रतिमा खराब ना होऊन जावो. त्यावेळी विवाहित अभिनेत्यांची आणि अभिनेत्रींची कारकीर्द लवकर संपत होते.
लग्नानंतर पूजा खूप काळापर्यंत लंडन मध्येच राहिली होती. सनी देखील पूजाशी भेटायला लपून छपून लंडन ला जात होते. एवढेच नाही तर जेव्हा वृत्तपत्रात सनीच्या लग्नाची बातमी छापली होती तर त्यांनी या गोष्टीला नकार दिला होता.
तथापि काही काळानंतर सनी ने या गोष्टीला सत्य सांगितले होते, परंतु आज देखील ते पत्नी आणि वैवाहिक जीवनाशी निगडित गोष्टी वैयक्तिक ठेवतात. सध्या सनी आपली पत्नी व आपल्या मुलांसोबत लॉकडाऊन मध्ये घालवत आहे.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.