जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या हातात अचानकपणे फुटला होता बॉम्ब, तेव्हा जखमी हातांनी पडद्यावर…

अमिताभ यांना या जखमेतून बरे होण्यासाठी लागले 2 महिने आणि आज त्यांचे बोट हे कमाल दाखवत आहेत.शतकातील महानायक अमिताभ बच्चन पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात.

यासोबतच ते आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियावरून जोडलेले असतात. अमिताभ सोशल मीडियावर अनेक वेळा आपल्या आयुष्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात.

हल्लीच अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून त्या दिवसांना आठवले होते जेव्हा दिवाळीत फटाके लावताना त्यांचे हात जळाले होते. याचे कारण हे होते की त्यांनी हातात बॉम्ब घेतला होता जो लगेच फुटला होता आणि याची जखम त्यांनी 2 महिने झेलली होती.

बिग बी यांनी ट्विट करत आपल्या चाहत्यांना म्हणाले की बोटे हे आपल्या शरीराचे सर्वात अवघड भाग असतात. त्याला नेहमी हालचालीची गरज असते. मला लक्षात आहे की जेव्हा एकदा दिवाळीच्या दिवशी माझ्या हातात बॉम्ब फुटला होता.

त्या बॉम्बमुळे माझ्या हाताला खूप गंभीर दुखापत झाली होती. यामुळे अंगठा व तर्जनी हलवण्यासाठी मला 2 महिन्यांचा कालावधी लागला होता.

अमिताभ यांनी ही घटना अत्यंत सकारात्मक मार्गाने घेतली आणि या घटनेचा उल्लेख केला. अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, काम चालू होते…हातावर वेगळ्या शैलीसाठी रुमाल बांधला होता…आणि एका खिशात वृत्ती घेऊन… परंतु काम चालू होते, जसे ते पाहिजे होते. अमिताभ बच्चन यांनी या घटनेनंतर हातावर रुमाल बांधून नृत्य केले होते आणि त्या हाताला खिशात टाकून अभिनय केला होता.

पुढे जाऊन हाच त्यांचा सिग्नेचर स्टेप बनला. त्यावेळी लोकांना माहिती नव्हते की अमिताभ नवीन नृत्य शैलीसाठी नाही तर घटनेमुळे असे नृत्य करत होते. आजपण लोक अमिताभ यांचा अभिनय करण्यासाठी त्यांच्या ह्या अंदाजाचा वापर करतात.

अमिताभ बच्चन यांनी याशिवाय चाहत्यांशी डॉन या चित्रपटाला 42 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपला आनंद व्यक्त केला. या चित्रपटाने अमिताभ यांच्या कारकिर्दीला वेगळ्या उंचीवर नेहण्यास मदत केली.

अमिताभ यांनी या चित्रपटानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही आणि आजपण एकापेक्षा एक हिट चित्रपट घेऊन आपल्या चाहत्यांसमोर हाजिर झाले आहेत. अमिताभ बच्चन यावर्षी आपल्या चाहत्यांसाठी 4 चित्रपट आणणार आहेत, परंतु लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबले आहे. आता अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या तारखा पुढे ढकलल्या गेल्या आहेत.

तथापि चाहत्यांना नाराज होण्याची गरज नाही आहे. अमिताभ आणि आयुष्मान यांचा चित्रपट गुलाबो सिताबो ला डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले गेले आहे. तरण आदर्श यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितले की या चित्रपटाला 12 जून पासून अमझोन प्राईमवर प्रदर्शित केल्या जाईल. हा चित्रपट चाहत्यांसाठी खूप चांगला ठरला असता, परंतु चित्रपटगृहांचे उघडणे अत्यंत कठीण मानले जात आहे.

अशा परिस्थितीत या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित केले जाईल. याशिवाय अमिताभ यांचा झुंड या चित्रपट देखील 8 मे रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु या चित्रपटाला सुद्धा ऑनलाईन प्रदर्शित केले जाईल.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.