देशात नाही तर परदेशात झाला आहे या कलाकारांचा जन्म,भारतीय नसून परप्रांतीय आहेत हे कलाकार!!

चित्रपट सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे भारतात राहतात, येथील चित्रपटात काम करतात परंतु त्यांची जन्मभूमी भारत नाही आहे. या कलाकारांचा जन्म परदेशात झाला आहे. जरी त्यांची जन्मभूमी भारत नसेल परंतु त्यांची कर्मभूमी भारत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण त्या कलाकारांबद्दल बोलणार आहोत ज्यांचा जन्म परदेशात झाला आहे.

आलिया भट्ट- ब्रिटनमध्ये जन्मलेल्या आलिया भट्टची आजी जर्मन आहे आणि आजोबा काश्मिरी पंडित आहेत. जेव्हा आलियाचा जन्म होणार होता तेव्हा तिची आई सोनी राजदान यूकेला निघून गेली होती. आलियाकडे ब्रिटिश पासपोर्ट देखील आहे.

कॅटरिना कैफ- कॅटरिना मूलतः यूकेची आहे. कॅटरिनाचा जन्म हाँगकाँग मध्ये झाला होता. अनेक देशात आपले बालपण व्यतीत केल्यानंतर कॅटरिना भारतात येऊन स्थायिक झाली आणि इथल्या चित्रपटात काम करू लागली. तथापि, ती इथे काम परमिटवर राहत आहे.

जॅकलिन फर्नांडिस- श्रीलंकेतील सुंदरता जॅकलिन फर्नांडिस मागच्या 10 वर्षांपासून भारतात राहत आहे. जॅकलिनकडे श्रीलंकेचा पासपोर्ट आहे. जॅकलिनचा जन्म बहरीन मध्ये झाला होता.

सनी लियॉन- बॉलिवूड मध्ये नाव कमावणारी सनी लियॉन कॅनडा मध्ये राहणारी आहे. सनीचा जन्म कॅनडा मधील सर्निया मध्ये झाला होता.

नीलम- 80 – 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री नीलमचा जन्म हाँगकाँग मध्ये झाला होता. नीलम ही एका व्यावसायिक कुटुंबाकडून येते.

नरगीस फाखरी- नरगीस पाकिस्तानी मूलतः अमेरिकन नागरिक आहे. नरगीसचा जन्म न्यूयॉर्क मध्ये झाला आहे. बॉलिवूड मधील अयशस्वी कारकिर्दीमुळे ती वापस न्यूयॉर्कला चालल्या गेली.

मनीषा कोइराला- मनीषा कोइराला 90 च्या दशकातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे. मनीषाचा जन्म नेपाळ मध्ये झाला होता आणि त्यांचे दादा हे नेपाळचे प्रधानमंत्री होते. मनिषाचे शिक्षण हे भारतात राहूनच झाले आहे.

दीपिका पादुकोण- सर्वात आधी आपण बोलूया दीपिका पादुकोण विषयी. बंगळूर मध्ये वाढलेल्या दीपिकाचा जन्म कोपेनहेगन म्हणजेच डेन्मार्क मध्ये झाला होता. म्हणून बऱ्याच काळापर्यंत त्यांच्याकडे डैनिश पासपोर्ट होता.

इमरान खान- आमिर खानचा भाचा इमरान खानकडे देखील अमेरिकन पासपोर्ट आहे. इमरानच्या वडिलांकडे अमेरिकन नागरिकत्व आहे. अमेरिकेत जन्मलेल्या इमरानचे शिक्षण हे तिथेच झाले आहे. मुंबईमध्ये राहणारा इमरान हा अमेरिकन आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.