आश्चर्यकारक!! ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे या काँग्रेस आमदाराची मुलगी, नाव एकूण थक्क व्हाल!!

सध्या बॉलिवूडमध्ये दोन बहिणी आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांचे वडील काँग्रेसचे आमदार असल्याचं क्विचितच काही जणांना माहिती असावं.

राजकारण आणि बॉलिवूड यांचे संबंध काही नवे नाहीत. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेशनं इंडस्ट्रीत चांगला जम बसवला. तर रामविलास पासवान यांचा मुलगा चिरागनं बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं.

त्यात त्याला यश आलं. सध्या बॉलिवूडमध्ये दोन बहिणी आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांचे वडील काँग्रेसचे आमदार असल्याचं क्विचितच काही जणांना माहिती असावं.

नेहा शर्मा आणि आएशा शर्मा या दोन नवोदित अभिनेत्री सध्या बॉलिवूडमध्ये धडपडत आहेत. नेहा शर्मानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. पण, तिच्या अभिनयाला फारशी दाद मिळालेली नाही. ती सोशल मीडियावर मात्र, प्रचंड लोकप्रिय आहे.

नेहानं, आगामी तान्हाजी सिनेमात काम केलंय. कलाकारांच्या गर्दीति त्या सिनेमात तिला कितपत संधी मिळालीय हे माहिती नाही. तिचे जयंता भाई की लव्ह स्टोरी, क्रूक्स, यंगीस्तान हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर साफ आपटले आहेत.

नेहा आणखी एका पंजाबी सिनेमातही काम करत आहे. नेहाच्या तुलनेत तिची छोटी बहिणी आएशा अभिनयात उजवी असल्याची इंडस्ट्रीत चर्चा आहे. सत्यमेव जयते या सिनेमात ती जॉन अब्राहमच्या अपोझिट दिसली आहे.

पण, त्यानंतर तिचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. नेहा आणि आएशा दोघीही सोशल मीडियावरच्या त्यांच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असतात.

शर्मा भगिनींचे वडील हे बिहारमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. अजित शर्मा हे मोठे व्यावसायिक आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय कारकिर्द सुरू केली. सध्या ते बिहारमधील भागलपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

अजित शर्मा यांनी यापूर्वी, त्यांनी तीन वेळा विधानसभा आणि एक वेळा लोकसभा निवडणूक लढवली होती. पण, त्यात त्यांचा पराभव झाला होता. बिहारमधील काँग्रेसच्या निष्ठावान नेत्यांमध्ये अजित शर्मा यांचं नाव घेतलं जातं.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.