अगदी लहानपणापासून चित्रपटात काम करत आहेत हे 8 सुपरस्टार,लहानपणीच्या फोटो मध्ये ओळखानेही आहे अवघड!!

बॉलिवूड मध्ये काही अभिनेते असे आहेत जे लहानपणापासून चित्रपटात काम करत आहेत. बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या या कलाकारांनी आज मोठे नाव कमावले आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा अभिनेत्यांबद्दल

1. जुगल हंसराज : जुगल हंसराज बॉलिवूड मधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्यांनी 1983 साली आलेल्या मासूम चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या जुगल हंसराजने बॉलिवूड मध्ये खूप चांगली लोकप्रियता मिळवली. जुगल हंसराज बॉलिवूड मध्ये निर्माता म्हणून काम करत आहे.

2. हृतिक रोशन : बॉलिवूड मधील देखणा अभिनेता हृतिक रोशन देखील लहानपापासून बॉलिवूड मध्ये काम करत आहे, त्याने ‘ आशा ‘, ‘ आपके दिवाने ‘ आणि ‘ भगवान दादा ‘ या चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती.

3. उर्मिला मातोंडकर : एका काळातील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने मासूम आणि कलियुग या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी मराठी चित्रपट ‘ जाकोल ‘ मध्ये बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती.

4. आमिर खान : सन 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ यादों की बारात ‘ या सुपरहिट चित्रपटाने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. मोठे झाल्यानंतर त्याने कधीही आपल्या अभिनय कारकिर्दीकडे मागे वळून पाहिले नाही आणि आज बॉलिवूड मध्येच नाही तर संपूर्ण जगातही त्याने आपला ठसा उमटवला आहे.

5. कुणाल खेमु : सध्याच्या चित्रपटात खलनायक म्हणून दिसणाऱ्या या अभिनेत्याला लहानपणी चित्रपटांमध्ये बरीच लोकप्रियता मिळाली होती. कुणाल खेमु ने ‘ हम है राही प्यार के ‘ आणि ‘ राजा हिंदुस्तानी ‘ यांसारख्या मोठ्या चित्रपटात काम केले आहे.

6. श्रीदेवी : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी बॉलिवूड मध्ये आपली स्वतः ची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. बॉलिवुड मधील लेडी सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवीने वयाच्या चौथ्या वर्षापासूनच बॉलिवुड मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

तमिळ चित्रपट ‘ थुनईवन ‘ मधून आपल्या अभिनाला सुरुवात करणाऱ्या श्रीदेवीने 1975 मध्ये आलेल्या जुली चित्रपटात बालपणीची भूमिका साकारली होती. बॉलिवूड मधील सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये आज त्यांचे नाव आहे.

7. संजय दत्त : रॉकी या चित्रपटापासून मुख्य कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे बॉलिवूडचे सुपरस्टार संजय दत्त सुद्धा या यादीमध्ये सामील आहेत. त्यांनी 1972 मध्ये आलेल्या रेशमा आणि शेरा या चित्रपटांमध्ये कव्वाली गायकाची भूमिका साकारली होती.

8. आफताब शिवदासानी : आफताब शिवदासानी हे सध्या बॉलिवूड मध्ये कमी दिसतात परंतु त्यानेही आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही बालकलाकार म्हणून केली होती. मिस्टर इंडियापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आफताब शिवदासानीने चित्रपट शहंशहा मध्ये अमिताभ बच्चन यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.