नीता अंबानी पेक्षाही सुंदर आहे त्यांची बहीण, खूपच सोपे व वेगळे जगते आपले आयुष्य

मुकेश अंबानी यांच्यासोबतच त्यांचे परिवार सुद्धा जास्त चर्चेत असणारे कुटुंब मानले जाते, मग तो या कुटुंबातील कोणताही सदस्य असो तरी सगळेजण चर्चेत राहतात. तुम्हाला आठवत असेल की मागच्या वर्षी अंबानी कुटुंबीयांनी त्यांची प्रिय मुलगी ईशा अंबानी हिचे लग्न अगदी शाही थाटात केले होते. ज्याची चर्चा ही सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाली होती

अंबानी कुटुंब हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब असल्यामुळे मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार हा नेहमी चर्चेत असतो. परंतु जर तुमच्या लक्षात आले असेल तर अंबानी कुटुंबात यावेळी आणखी एक सदस्य होता ज्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.

खरतर आम्ही बोलत आहोत ममता दलाल यांच्याबद्दल ज्या निता अंबानी यांच्या भगिनी आहेत. मात्र जरी ममता दलाल या टाइमलाइम पासून दूर राहत असतील तरी त्यांना कोणत्याही कार्यक्रमात निता अंबानी यांच्यासोबतच बघितले जाते.

मग ते इशाचे लग्न असो किंवा आकाश अंबानीची सगळीकडे त्या निता सोबत उपस्थित राहतात ज्यांचे फोटो पण सोशल मीडियावर खूप व्हायरल होत होते.

एकीकडे जिथे निता अंबानी ह्या आपल्या राजेशाही जीवनशैलीसाठी ओळखल्या जातात तर तिकडे त्यांच्या भगिनी ह्या साधं आयुष्य जगतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ममता दलाल ह्या धीरुभाई अंबानी या शाळेतच एक शिक्षिका आहे ज्यांना निता अंबानी ह्या सांभाळतात.

जसे की तुम्हाला माहितीच असेल की या शाळेत बहुतेक कलाकारांचे मुलेच शिक्षण घेतात, ज्याकारणामुळे ममता दलाल यांचे बॉलिवूडमध्ये येणे – जाणे चालू असते.

ममता दलाल यांनी आकाश अंबानींच्या लग्नात लाल रंगाची साडी घातली होती, ज्यामध्ये त्या खूप सुंदर दिसत होत्या. त्याचवेळी नीता अंबानी यांची आई पौर्णिमा दलाल यांनी क्रीम रंगाची साडी घालून सोबत हलका मेकअप केला होता. पौर्णिमा दलाल यांना बघून स्पष्टपणे समजते की दोन्ही मुलींमध्ये सुंदरतेचा गुण हा आईकडून आला आहे.

हे ऐकुन तुम्हाला विश्वास बसणार नाही की अनेक वेळा ममताला फॅशन डिझायनर मनीषा मल्होत्रा यांच्यासाठी रॅम्प वॉक करताना पाहिले गेले आहे. ममता दलाल साधे आयुष्य जगतात. ममताला साधे जीवन आवडते, म्हणून सर्वांशी चांगली ओळख असूनही त्या टाइमलाइम पासून दूर राहतात.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.