असे म्हणले जाते की दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना भेटण्यापासून जगातील कोणतीच शक्ती रोखू शकत नाही. भारतामध्ये लव्ह मॅरेज साठी प्रत्येक कुटुंब सहमत नसते. अशा परिस्थितीत जोडप्यांना नाईलाजाने घरातून पळून जाऊन आपल्या प्रियकराशी लग्न करावे लागते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या त्या विवाहित जोडप्यांचा परिचय करून देणार आहोत त्यांनी कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन लग्न केले होते.
शम्मी कपूर आणि गीता बाली:-‘ रंगीन राते ‘ या चित्रपटाच्या सेटवर शम्मी कपूर यांना गीता बाली वर प्रेम झाले होते. गीता वयाने शम्मी पेक्षा एका वर्षाने मोठी होती.
शम्मी यांना अशी भीती वाटत होती की घरातले त्यांच्या लग्नाला परवानगी देणार नाहीत म्हणून दोघांनी पळून जाऊन मुंबई मधील बंगाना मंदिरात लग्न केले होते. या लग्नाचे साक्षीदार दिग्दर्शक – निर्माता हरी वालिया हे बनले होते.
भाग्यश्री पटवर्धन आणि हिमालय दसानी:-भाग्यश्री ने केवळ वयाच्या 21 व्या वर्षी हिमालय दसानी यांच्यासोबत लग्न केले होते. हे दोघे शालेय जीवनापासून प्रेम संबंधात होते. कारण भाग्यश्री शाही मराठी कुटुंबातील आहेत म्हणून त्यांच्या घरातले लग्नासाठी तयार नव्हते. याचा परिणाम दोघांनीही पळून जाऊन लग्न केले.
आमिर खान आणि रिना दत्त:-रीना आमिर खानची शेजारीण होती. आमिरने वयाच्या 21 व्या वर्षीच रीनाला प्रपोज केले होते. आमिरने एकदा आपल्या रक्ताने री प्रेम पत्र सुद्धा लिहिले होते.
दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते त्यामुळे कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हते. अशा परिस्थितीत रीना व आमिरने पळून जाऊन लग्न केले होते. काही वर्षांनंतर दोघांमध्ये घटस्फोट झाला आणि आमिरने किरण राव सोबत दुसरे लग्न केले.
शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरी:-शक्ती कपूर हे 16 वर्षीय शिवांगी कोल्हापुरी च्या प्रेमात पडले होते. शिवांगीच्या कुटुंबातील मात्र मागासलेले होते. ते तर शिवांगीला मोकळ्या केसात सुद्धा फिरू देत नव्हते.
अशा परिस्थितीत त्यांना अरेंज मॅरेज साठी पटवणे सोपे होते. दोन वर्षांनंतर जेव्हा शिवांगी 18 वर्षाची झाली तेव्हा हिम्मत करून ती घरातून पळून गेली आणि शक्ती कपूर सोबत लग्न केले.
पद्मिनी कोल्हापुरी आणि प्रदीप शर्मा:-आपली बहीण शिवांगी सारखं पद्मिनीने सुद्धा पळून जाऊन लग्न केले होते. प्रदीप शर्माने पद्मिनीला आपला चित्रपट ‘ ऐसा प्यार कहाॅं ‘ साठी साइन केले होते. इथूनच त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते म्हणून कुटुंबीय तयार नव्हते. हेच कारण होते की दोघांनी मुंबईमध्ये आपल्या एका मित्राच्या घरी जाऊन लग्न केले.
गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी:-रामायणाच्या या लोकप्रिय जोडीने भले 2011 मध्ये अधिकृतपणे लग्न केले असेल परंतु फारच थोड्या लोकांना माहिती आहे की या दोघांनी 2006 मध्ये देखील लग्न केले होते. गुरमीत आणि देबिना तेव्हा 19 व 20 वर्षांचे होते. त्यांनी घरच्यांना सांगितले नव्हते आणि मित्रांच्या मदतीने गुरगाव मधील एका मंदिरात लग्न केले होते.
शशि कपूर आणि जेनिफर केंडल:-जेनिफर थेटर करत असतानाच तिची ओळख शशि यांच्यासोबत झाली. लवकरच दोघांचे प्रेम झाले. जेनिफरचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते म्हणून त्यांनी पळून जाऊन लग्न केले.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.