शाहरुख खानचे झाले आहे 3 वेळा  लग्न,लग्न करण्यासाठी 5 दिवसासाठी केले होते धर्म परिवर्तन!!

शाहरुख खानला आपण सगळे बॉलिवूडचा राजा म्हणून ओळखतो. शाहरुखची अभिनय क्षमता, शैली आणि लूक पाहून आजपण करोडो लोक पागल होऊन जातात. शाहरुख आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत राहतो. शाहरुखने सन 1991 साली गौरी खान सोबत लग्न केले होते.

आज गौरी सुद्धा एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही आहे. शाहरुख आणि गौरी यांची जोडी ही बॉलिवूड मध्ये खूप प्रसिद्ध आहे. या दोघांची प्रेम कथा ही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही आहे. शाहरुख आणि गौरी यांची भेट ही महाविद्यालयीन जीवनात झाली होती.

ते दोघे एक सामान्य मित्र म्हणून महाविद्यालयाच्या पार्टीत भेटले होते. त्यांच्या मध्ये आधी मैत्री झाली होती आणि नंतर मग प्रेम झाले होते. 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी सन 1991 मध्ये लग्न केले. याच एका वर्षांनंतर शाहरुखने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते.

गौरीला मिळवण्यासाठी शाहरुख ने बरेच कष्ट घेतले होते. खरतर दोघांचे धर्म वेगवेगळे असल्यामुळे गौरीचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हते. शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा जेव्हा तो गौरीला बोलण्यासाठी घरच्या लॅंडलाइनवर कॉल करत होता तेव्हा तिचा भाऊ कॉल उचलत होता.

अशा परिस्थितीत शाहरुख मुलीच्या आवाजात विचारत होते की गौरी घरी आहे का ? गौरीचा भाऊ शाहरुखला मुलगी समजत होता आणि आपल्या बहिणीकडे फोन देत होता. या दोघांच्या नात्यांमध्ये धर्माची भिंत मध्ये येत होती.

अशा परिस्थितीत शाहरुख 5 वर्षांपर्यंत गौरीच्या कुटुंबीयांसोबत हिंदू बनून भेटत होते. मात्र नंतर त्यांनी हे सत्य सर्वांना सांगून दिले होते आणि खूप मेहनतीने गौरीच्या कुटुंबीयांना लग्नासाठी तयार केले.

तुमच्या मधून बऱ्याच लोकांना हे जाणून आश्चर्य होईल की शाहरुख आणि गौरी यांनी एकमेकांसोबत 3 वेळा लग्न केले आहे. टाइम्स ऑफ इंडिया मधील एका बातमीनुसार शाहरुख खानने गौरी सोबत सर्वात पहिले कोर्टात लग्न केले होते. यानंतर दोघांनी 26 ऑगस्ट 1991 मध्ये मुस्लिम चालीरीती प्रमाणे लग्न केले.

एवढेच नाही तर 25 ऑक्टोंबर 1991 मध्ये पुन्हा एकदा दोघांनी हिंदू चालीरीती प्रमाणे लग्न केले. अशाप्रकारे शाहरुख व गौरी यांचे तीन वेळ लग्न झाले आहे. खरतर शाहरुख मुस्लिम आणि गौरी पंजाबी असल्यामुळे यादोघांना हिंदू व मुस्लिम या दोन्ही चालीरिती प्रमाणे लग्न करावे लागले होते.

सध्या शाहरुख व गौरी यांच्या लग्नाला 29 वर्ष झाले आहेत. हे दोघे आजपण एकमेकांसोबत आनंदाने राहत आहेत. शाहरुखने बॉलिवूड मध्ये बक्कळ पैसा आणि नाव कमवल आहे, करोडो मुली त्यांच्या चाहत्या आहेत.

असे असूनही, शाहरुख अजूनही त्यांचे पहिले प्रेम म्हणजे गौरी खानशी निष्ठावान आहेत. त्यांचे एक सुखी कुटुंब आहे ज्यामध्ये मोठा मुलगा आर्यन, मंजली मुलगी सुहाना आणि धाकटा मुलगा अबराम सामील आहे. कामाबद्दल बोलायचे झाले तर शाहरुखला शेवटी ‘झिरो’ चित्रपटात पाहिले गेले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाही.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.