अभिनेता परेश रावलची पत्नी यांची पत्नी आहे खूप सुंदर,जिंकलेली आहे मिस इंडिया किताब

बॉलिवूडचा प्रतिभावान अभिनेता परेश रावल यांचा जन्मदिवस 30 मे रोजी झाला. सध्या त्यांचे वय 65 आहे. 1955 मध्ये मुंबईत गुजराती कुटुंबात जन्मलेल्या परेश रावल यांनी हिंदी चित्रपटात एकापेक्षा एक हिट चित्रपट केले. त्यांना आधी इंजिनिअर व्हायचं होतं, पण नशिबाला त्यांना अभिनेता बनवायचे होते.

परेश पहिल्यांदा चित्रपटांमध्ये दिसले तेव्हाच त्यांनी लोकांच्या मनावर छाप पाडणारी भूमिका केली.फिल्मबरोबरच परेश सोशल मीडियावरही खूप अ‍ॅ-क्टिव असतात. मात्र, सोशल मीडियावर परेश रावल यांचे कुटुंब क्व-चितच पाहायला मिळते.त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो शेअर केला.

चला तर जाणून घेऊया की परेश रावल यांची पत्नी कोण आहे आणि त्यांचे लग्न कसे झाले.परेश रावल यांची पत्नी स्वरूप संपत ही माजी मिस इंडिया आहे. तरीही ती तिचे आयुष्य अगदी सोप्या पद्धतीने जगते. एका मुलाखती दरम्यान परेश म्हणाले होते की स्वरूपचे वडील इंडियन नॅशनल थिएटरचे निर्माते होते.

मी एकदा मित्रांसह एक बंगाली नाटक बघायला गेलो होतो. तेव्हा माझी नजर स्वरूप वर पडली. तिला पाहून मी माझ्या मित्राला म्हणालो की ही मुलगी एक दिवस माझी पत्नी होईल. त्यावर त्याने मला विचारले होते – ती मुलगी कोण आहे हे तुला ठाऊक आहे काय? मी म्हणालो – ते नाही माहीत पण ही माझी पत्नी होईल. त्यावेळी स्वरूप फक्त 16 वर्षांची होती.जेसे परेश एका नजरेतच स्वरूप वर फि-दा झाले होते तसेच स्वरूपलाही परेश एका नजरेतच पसंत पडले होते.

वास्तविक परेश स्टेजवर परफॉ-र्म-न्स देत होते, त्याचवेळी जेव्हा स्वरूपाने त्यांना पाहिले तेव्हा ती त्यांची चाहती झाली. तीने परेशला विचारलं- तू कोण आहेस? तू खूप चांगला अभिनय करतोस.

या भेटीनंतर संभाषण होत गेले आणि शेवटी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.यानंतर दोघांनी 1987 मध्ये अगदी सोप्या पद्धतीने लग्न केले. त्यावेळी खूप कमी लोक असे होते की ज्यांना माहिती होत की हा प्रेमविवाह आहे.

हे लग्न मुंबईतील लक्ष्मीनारायण मंदिरात झाले. एका मुलाखतीत परेश रावल यांनी सांगितले की, त्यांचे लग्न झाडाखाली झाले होते. त्यांच्या लग्नात मंडपही नव्हता. पंडित जी त्या जुन्या झाडाखाली बसून मंत्र पठण करीत होते.

येथे दोघांनीही कुटुंबासमोर देवाला साक्षी मानून सात फेरे घेतले. आज परेश आणि स्वरूप यांना आदित्य आणि अनिरुद्ध हे दोन मुल आहेत.परेश रावल यांनी पडद्यावर अनेक प्रकारची पात्रे साकारली पण वास्तविक जीवनात ते खूप रोमँ टिक आहेत.

आपल्या अभिनयातून त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत एक ठसा उमटविला. त्यांनी सर्व प्रकारच्या म्हणजेच सकारात्मक, नकारात्मक भूमिका केल्या, परंतु एक हस्य कलाकार म्हणून त्यांना सर्वाधिक पसंती मिळाली. वास्तविक जीवनात परेश खूप आनंदी नि उत्साही आहे आणि त्याचा थेट परिणाम चित्रपटांमध्येही दिसून येतो.

परेशने हिंदी सिनेमात आंखें आवारा पागल दीवाना, बुस्टा, हंगामा, मालमाल विकली, चूप चूप के, भागम भाग मेरे बाप पेहले आप, रेडी, खिलाडी 786, संजू आणि हेरा फेरी ई. चित्रपट केलेत.

या सर्व चित्रपटांमधून परेशने लोकांना खूप हसवले आहे. त्यांच्या हेरा फेरी चित्रपटातील बाबूराव गणपतराव आपटे ही व्यक्तिरेखा सर्वांच्या आवडीची आहे. लॉकडाउननंतर परेश हंगामा 2, स्टॉर्म, आंख मिचौली आणि कुली नंबर 1 मध्ये दिसणार आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.