सुशांत सिंग मृत्यू प्रकरण: नक्की आदित्य ठाकरे आणि रिया चा काय संबंध आहे?वकिलांनी केला मोठा खुलासा

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाशी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव जोडण्यावरुन अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘रिया आदित्य ठाकरेंना कधीच भेटली नाही. ते शिवसेनेचे नेते आहेत इतकंच तिला ठाऊक आहे’, असं ते म्हणाले. त्याचसोबत अभिनेता डिनो मोरियाला रिया फक्त कार्यक्रमांमध्ये भेटली असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार सतीश मानशिंदे यांनी अधिकृत स्टेटमेंट जाहीर केला आहे. त्यात ते म्हणाले, ‘रिया आदित्य ठाकरेंना ओळखत नाही आणि तिने कधीच त्यांची भेटसुद्धा घेतली नाही.

रियाने कधीच फोनवरून किंवा इतर कोणत्या माध्यमांतून त्यांच्याशी संपर्क साधला नाही किंवा बोलली नाही. तर अभिनेता डिनो मोरियाला रिया ओळखत असून इंडस्ट्रीतील एक कलाकार म्हणून काही कार्यक्रमांमध्ये दोघांची भेट झाली होती.’

सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी ईडी रिया व तिच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहे. याविषयी तिच्या वकिलांनी पुढे म्हटलं, ‘रियाला मुंबई पोलीस व ईडीने समन्स बजावले होते. तिला बोलावण्यात आलेल्या सर्व तारखांना ती चौकशीसाठी उपस्थित होती.

मुंबई पोलीस व ईडीने रिया आणि सुशांत यांच्यातील नातं आणि तिच्या आर्थिक गोष्टींबाबत कसून चौकशी केली. याप्रकरणी मुंबई पोलीस आणि ईडीने रियाचा फोन, लॅपटॉप आणि तिचा डीएनएसुद्धा घेतला आहे. यासोबतच तिचे बँक स्टेटमेंट्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स, सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर आणि इलेक्ट्रॉनिक डेटा मुंबई पोलीस व ईडीने घेतले आहेत.

पोलिसांच्या तपासाचा अहवाल सुप्रीम कोर्टाला सुपूर्द करण्यात आला आहे. रियावर अजूनही बरेच आरोप करण्यात येत आहेत. मात्र ती या सर्व आरोपांवर गप्प आहे. सत्य बदलणार नाही.’

डिसेंबर २०१९ मध्ये रिया सुशांतच्या घरी राहायला गेली असंही त्यांनी त्यात स्पष्ट केलं. एप्रिल २०१९ मध्ये एका पार्टीला रिया व सुशांतने हजेरी लावली होती. त्यानंतर ते दोघं डेट करू लागले.

सुशांतच्या वांद्रे इथल्या राहत्या घरी रिया डिसेंबरमध्ये शिफ्ट झाली आणि ८ जून २०२० पर्यंत रिया व सुशांत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. ८ जून रोजी रियाने सुशांतचं घर सोडलं.१४ जून रोजी सुशांतने वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफा-स घेऊन आ-त्महत्-या केली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.