सैफ अली खानने केल होत हे मोठ कांड, कॅमेऱ्यासमोर मागावी लागली होती अमृता सिंहशी माफी

सैफ अली खान हे बॉलिवूड मध्ये छोटे नवाब म्हणून ओळखले जातात. जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे की सैफ चे पहिले लग्न हे अभिनेत्री अमृता सिंह सोबत झाले होते. त्यांनी हे लग्न सर्वांशी लपत केले होते. त्याच्या या लग्नामुळे घरातले सुद्धा नाराज झाले होते, कारण अमृता सैफ पेक्षा 13 वर्षांनी मोठी होती. पण हळू हळू प्रकरण मिटत आले आणि त्यांनी सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात केली.

हिंदू कुटुंबातून आलेल्या अमृताने सैफ सोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. सैफ आणि अमृताचे दोन मुले आहेत ज्यांचे नाव सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे आहे. मात्र, आता दोघांचाही घटस्फो-ट झाला आहे आणि सैफने 16 ऑक्टोंबर 2012 रोजी करीना कपूर सोबत लग्न केले.

जेव्हापासून सैफने अमृताशी घटस्फो-ट घेऊन करीनाशी लग्न केले आहे तेव्हापासून ते कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत आहेत. अशा परिस्थितीत सैफ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परंतु, यावेळी ते आपल्या एका जुन्या गोष्टीमुळे चर्चा निर्माण करत आहेत. सन 1994 च्या कथेत लोक यामुळे रस घेत आहेत कारण एकवेळेस सैफ अली खान ने आपली पहिली पत्नी अमृता सिंहशी कॅमेऱ्यासमोर माफी मागितली होती.

होय. तुम्ही बरोबर वाचले. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा बॉलिवूड मध्ये सैफ अली खानचे पदार्पण झाले होते. त्यानी चॉकलेटी अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. महिला चाहत्यांमध्ये सैफ बऱ्यापैकी लोकप्रिय होता. नेहमी ते आपल्या महिला चाहत्यांशी घेरलेले असायचे. परंतु यादरम्यान ते विवाहित सुद्धा होते. 1991 सालीच त्यांनी अमृता सिंह सोबत लग्न केले होते.

जसे की आम्ही तुम्हाला सांगितले अमृता आणि सैफ यांच्यात वयाचे देखील अंतर होते आणि जेव्हा तेव्हा लोक याबद्दल चर्चा करत होते. तथापि, दोघांमध्ये समजूतदारपणा हा बराच चांगला होता, म्हणून त्यांना या गोष्टीचा फारसा फरक पडत नव्हता. आम्ही तुम्हाला चित्रपट ‘ मैं खिलाडी तू अनाडी ‘ च्या दरम्यानचा किस्सा सांगणार आहोत.

असे सांगितले जाते की जेव्हा या चित्रपटाचा प्रीमियर होता त्यावेळी सुद्धा सैफ अली खान हे आपल्या महिला चाहत्यांशी घेरलेले होते. अशा परिस्थितीत एका महिला चाहत्याने त्यांच्यासोबत नाचण्याची विनंती केली. सैफ चाहत्यांचे म्हणने ऐकून नाचायला लागले. परंतु ही गोष्ट त्या मुलीच्या प्रियकराला पटली नाही आणि त्याचा सैफ सोबत वाद झाला.

वादानंतर हे प्रकरण खूप तापले होते. त्या मुलीच्या प्रियकरासोबत सैफची हानामारी सुद्धा झाली आणि त्याने सर्वांसमोर सैफला धमकावले. तथापि, सैफने हे प्रकरण जास्त नाही वाढवले किंवा त्याने पोलिसात सुद्धा तक्रार केली नाही. परंतु सैफला हे समजले होते की जेव्हा या प्रकरणाबाबत अमृताला समजेल तेव्हा ती खूप नाराज होईल.

अमृता त्यांच्यावर नाराज होऊ नये म्हणून सैफने प्रीमियर मधूनच कॅमेऱ्यासमोर अमृताची माफी मागितली आणि वचन दिले की आतापासून ते असे कृत्य अजिबात करणार नाही. त्याकाळात ही गोष्ट चित्रपटसृष्टीत खूप चर्चेत राहिली. लोकांमध्ये याबद्दल खूप दिवस चर्चा चालू होती.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.