एके काळी पेन विकून आपला उदरनिर्वाह करणारा हा कलाकार आज आहे भारतातील सर्वोत्कृष्ट हस्यसाम्राट!!

आत्ताच 14 ऑगस्टला भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदकार जॉनी लीव्हरचा वाढदिवस झाला. या खास प्रसंगी, त्याच्या जीवनाशी संबंधित काही खास माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे. 1957 मध्ये 14 ऑगस्ट या दिवशी, जॉनी लीव्हरचा जन्म आंध्र प्रदेशात झाला होता.

सर्वोत्कृष्ट कॉमेडियन म्हणून त्याने 13 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. 1984 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार्‍या जॉनीने आत्तापर्यंत 350हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

आर्थिक परिस्थिती विकट असल्यामुळे जॉनी जास्त शिकू शकला नाही. आंध्र प्रदेशातील तेलगू शाळेतून सातवीपर्यंत त्याने शिक्षण घेतले. अगदी लहान वयातच तो मुंबईतमध्ये आला आणि पोट भरण्यासाठी अनेक काम केले.मुंबई मधील धरावी येथील झोपडपट्टी मध्ये तो बरेच वर्ष राहिला,नंतर तो मुंबई मधील किंग सर्कल येथे सह परिवार स्थलांतरीत झाला.

दोन वेळा जेवण मिळण्यासाठी त्याने मुंबईच्या रस्त्यावर पेनही विकले. बॉलिवूडमधील गाण्यांवर नाचत आणि चित्रपटातील कलाकारांची नक्कल करत – करत तो पेन विकत असत.

आवड आणि अभिनयाच्या जोरावर त्याने आपली प्रतिभा विकसित केली. या कामात, त्याला मिमिक्री आर्टिस्ट प्रताप जैन आणि राम कुमार यांनी बरीच मदत केली.

जॉनीचे खरे नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे, त्याने आपल्या वडिलांसह मुंबईच्या हिंदुस्तान लीव्हर कंपनीतही काम केले आहे. काम करत असताना, तो त्याच्या कॉमिक प्रतिभेने आपल्या साथीदारांना हसवायचा. हळूहळू तो इतर फॅक्टरी कामगारांमध्ये लोकप्रिय झाला आणि येथे त्याला जॉनी लीव्हर हे नाव पडले.

जॉनीने कामाबरोबरच कार्यक्रमही सुरू केले, ज्यामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली. एका शोमध्ये बॉलिवूड अभिनेता सुनील दत्तने त्याची प्रतिभा ओळखली आणि त्याला ‘डर का रिश्ता’ मध्ये काम करण्याची संधी दिली. येथून जॉनीच्या यशाची सुरुवात झाली. आतापर्यंत त्याने 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.