तान्हाजी या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री!!

अजय देवगणच्या ‘तानाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली होती. 10 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले होते. अखेर चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला, यावरून याचा अंदाज आलाच पाहिजे.

हा चित्रपट अजय देवगणचा 100 वा चित्रपट आहे. अजयने यात मराठा वीर योद्धा तानाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अजयनेच नव्हे तर संपूर्ण स्टारकास्टने अपार मेहनत घेतली. मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

“तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या आहेत. काजोल, अजय देवगण, देवदत्त नागे, शरद केळकर आणि सैफ अली खान या महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. पण त्याचसोबत छोट्या छोट्या भूमिकेत असलेले कलाकार देखील प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले आहेत.

‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील चुलत्याच्या भूमिकेची देखील चांगलीच चर्चेत आली होती. ही भूमिका एका मराठमोळ्या अभिनेत्याने साकारली आहे.

या अभिनेत्याचे नाव कैलास वाघमारे असून त्याने याआधी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. कैलासची पत्नी देखील अभिनेत्री असून सध्या गाजत असलेल्या बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत ती पंचबाईच्या भूमिकेत दिसत आहे.

कैलासच्या पत्नीचे नाव मीनाक्षी राठोड असून ती दिसायला अतिशय सुंदर आहे.बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत नेहमीच भारतीय पेहरावात दिसणारी मीनाक्षी खर्या आयुष्यात अतिशय ग्लॅमरस असून तिचे अनेक ग्लॅमरस फोटो आपल्याला तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर दिसतील.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.