या दिवसात, संपूर्ण जग हे कोरोनामुळे त्रस्त आहे. या महामारीचा परिणाम हा मनोरंजनसृष्टीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कलाकारांना चित्रीकरणासाठी परवानगी दिली नव्हती.या दिवसात, संपूर्ण जग हे कोरोनामुळे त्रस्त आहे. या महामारीचा परिणाम हा मनोरंजनसृष्टीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कलाकारांना चित्रीकरणासाठी परवानगी दिली नव्हती.
तथापि, आता मुंबई सरकारच्या या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांची आवडती मालिका ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ मधील नट्टु काका उर्फ घनश्याम नायक सुद्धा या मुद्द्यावर बोलले आहेत.
घनश्याम नायक ने म्हणले आहे की – ‘ मला याचा आनंद आहे की ज्येष्ठ अभिनेत्यांना सुद्धा चित्रीकरणासाठी परवानगी दिली आहे. मी त्याच अभिनेत्यांमधून आहे जे शेवटच्या श्वासापर्यंत काम करू इच्छित आहेत.
होय, पण जर तब्येत बरी नसेल तर घरातून बाहेर निघणे योग्य नाही आहे. अमिताभ बच्चन तर हे माझ्यापेक्षा वयस्कर आहेत ते काम करू शकतात, तर मी का नाही ? ‘
या व्यतिरिक्त, घनश्याम नायक यांनी चित्रीकरणासाठी परत आल्याचा आनंद व्यक्त करत सांगितले की, ‘ बऱ्याच दिवसांपासून ज्या दिवसाची वाट पाहत होतो, तो दिवस आला आहे. ‘ तारक मेहता का उल्टा ‘ ही मालिका मागील 13 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे, आणि तेव्हा पासूनच घनश्याम नायक हे या मालिकेचे एक भाग झाले आहेत.
त्यांनी सांगितले की यादरम्यान त्यांना संजय लीला भन्साळी व करण जोहर यांच्या प्रोडक्शन हाऊसमधून देखील त्यांना भूमिकेसाठी ऑफर आली होती परंतु त्यांनी नकार दिला कारण त्यांना नट्टु काका ही व्यक्तिरेखा सर्वात जास्त आवडते आणि ते फक्त हीच मालिका करण्यात समाधानी आहेत.
त्यांनी सांगितले की, ‘ मी संपूर्ण आयुष्य संघर्ष केला परंतु 63 व्या वर्षी मला ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ ही मालिका मिळाली. मला 350 चित्रपटात काम करूनही जी ओळख मिळाली नाही ती ओळख मला ही मालिका करून मिळाली.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.