एके काळी मोलकरीण म्हणून काम करणारी मूळ सोलापूरची ही अभिनेत्री नंतर झाली सुप्रसिद्ध

70 च्या दशकातील हिट अभिनेत्री शशिकला यांनी दोन्ही प्रकारचे पात्रे साकारली. त्यांनी अभिनेत्री आणि वैम्प या दोन्ही प्रकारची पात्रे साकारली. त्यांनी जवळपास 100 बॉलिवूड चित्रपटात काम केले. सध्या तरी त्या बॉलिवूड पासून बऱ्याच काळापासून लांब आहेत.

शशी ह्या एका मराठी कुटुंबामधून आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. त्याचबरोबर त्यांना वैयक्तिक आयुष्यात सुद्धा खूप दुःख भेटले आहे. तर आज आम्ही तुम्हाला शशिकला यांच्याबद्दल रोचक गोष्टी सांगणार आहोत.

महाराष्ट्राशी ठेवतात त्या संबंध- शशी यांचे पूर्ण नाव हे शशिकला जावळकर आहे. शशिकला यांचा जन्म हा 4 ऑगस्ट, 1932 रोजी महाराष्ट्रातील सोलापुरात झाला होता. शशिकला यांचे जीवन हे खूप अस्थिर राहिले आहे. तथापि, शशिकला यांचे बालपण हे खूप चांगल्या प्रकारे गेले.

शशिकला यांचे वडील हे खूप श्रीमंत उद्योजक होते. शशिकला यांच्या वडिलांचा सोलापुरात कपड्यांचा मोठा व्यवसाय होता. शशिकला यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘ माझे वडील त्यांची सगळी कमाई ही त्यांच्या लहान भावाला पाठवत होते. तो लंडन मध्ये शिक्षण घेत होता. आम्ही 6 बहिण भावंडे होते. वडिलांनी आपल्या कुटुंबापेक्षा लहान भावाच्या जास्त गरजा पूर्ण केल्या.

जेव्हा भावाने केली फसवणूक- शशिकला या पुढे सांगतात की एक काळ असा आला की जेव्हा त्यांच्या लहान भावाला म्हणजे माझ्या काकांना खूप चांगली लागली. पण तेव्हा ते आमच्या कुटुंबाला विसरले. माझे वडील दिवाळखोर झाले. ते दिवस खूप कठीण होते. आम्हाला सुमारे 8 दिवस अन्न नाही मिळाले. आम्ही याची वाट बघत होतो की कोणीतरी आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलवावे.

वयाच्या 11 व्या वर्षीच काम शोधण्यासाठी सुरुवात केली- शशिकला या सांगतात की माझ्या वडिलांना खूप लोक म्हणाले की शशिकला दिसायला सुंदर आहे आणि चांगला अभिनय सुद्धा करते. तिला चित्रपटात काम मिळून जाईल. तेव्हा माझे वडील कुटुंबासोबत मुंबईला येऊन गेले. मी 11 वर्षांची होते. मी एक स्टुडिओपासून दुसऱ्या स्टुडिओकडे जाऊन काम शोधायला सुरुवात केली.

घरातील काम करण्यासाठी भाग पडली होती शशिकला- मुंबईमध्ये शशिकला यांनी काम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु त्यांना लवकर यश नाही मिळाले. नाइलाजाने त्यांना लोकांच्या घरी काम करावे लागले. याच दरम्यान माझी ओळख ही अभिनेत्री आणि गायिका नूरजहा यांच्याशी झाली. नूरजहा यांना मी चांगली वाटले आणि त्यांनी आपल्या पती शी बोलून मला चित्रपटात काम दिले.

पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते 25 रुपये- शशिकला यांनी 1945 मध्ये चित्रपट ‘ जीनत ‘ मध्ये काम केले. या चित्रपटासाठी त्यांना 25 रुपये मिळाले होते. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले चित्रपटात यश मिळाल्यानंतर शशिकला यांनी अभिनेता के. एल. सहगल यांचे नातेवाईक ओम प्रकाश यांच्यासोबत लग्न केलं. काही वेळा हा दोघांसाठी खूप चांगला गेला. या दरम्यान शशिकला यांनी दोन मुलींना सुद्धा जन्म दिला. परंतु पुढे चालून दोघांमध्ये मतभेद व वाद विवाद झाले.

परदेशात सुद्धा झाली फसवणूक- दोघांमध्ये तणाव इतका वाढला होता की एक दिवस शशिकला ह्या आपले घर आणि दोन्ही मुलींना सोडून एका व्यक्तीसोबत परदेशात निघून गेल्या. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. या गोष्टीबद्दल एका मुलाखतीत शशिकला यांनी सांगितले होते की ‘ ज्या व्यक्तीबरोबर मी परदेशात गेली होते त्या व्यक्तीने माझा खूप मानसिक व शारीरिक छळ केला. मोठ्या अडचणींतून स्वतः ला वाचवून मी भारतात आले.’

रस्त्यावर फिरावे लागले होते.- शशिकला यांनी सांगितले की ‘ परत आल्यानंतर वेड्यासारखी मी रस्त्यांवर फिरत होती. पदपथावर मी झोपत होते. जर कोणी हातात खाण्यासाठी काही ठेवत असत ते मी खाऊन टाकायचे.

शांततेच्या शोधात मी आश्रमांमध्ये व मंदिरात फिरली आणि मग मी कोलकता ला गेले. शशिकला यांनी कोलकाता मध्ये लोकांची सेवा केली जेव्हा त्यांना थोडी शांतता मिळाली तर मग पुन्हा त्या मुंबईत येऊन त्यांनी चित्रपटात काम सुरू केले. शशिकला या सध्या आपली लहान मुलगी व जावई यांच्यासोबत राहत आहे. मोठ्या मुलीचा कर्करोगामुळे मृत्-यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.