मुलांच्या फीसाठी शेजाऱ्यांसमोर हात पसरवायचे नट्टु काका, आता एवढ्या संपत्तीचे आहे मालक

सब टीव्ही वर प्रदर्शित होणारा कार्यक्रम तारक मेहता का उल्टा चष्मा हा सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण या मालिकेचा चाहता आहे. मागच्या 12 वर्षांपासून हा कार्यक्रम सर्वांचे मनोरंजन करत आहे. सलग 12 वर्षांपासून कार्यक्रमात असणारे पात्र हे लोकांच्या चेहऱ्यावरील हसण्याचे कारण ठरले आहेत.

हेच कारण आहे की तारक मेहता या मालिकेतील व्यक्तिरेखांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तथापि, आज आम्ही तुम्हाला या लेखात मालिकेतील लोकप्रिय पात्र नट्टू काका बद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया त्यांच्या वास्तविक आयुष्यातील काही रोचक गोष्टी

350 पेक्षा अधिक मालिका व सिनेमांमध्ये केले आहे काम- नट्टु यांचे खरे नाव हे घनश्याम नायक हे आहे. ते मूळचे गुजराती वंशाचे कलाकार आहेत, त्यांनी केवळ दूरदर्शन मालिकेतच नव्हे तर हिंदी चित्रपटात सुद्धा काम केले आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 75 वर्षीय घनश्याम नायक यांनी आपल्या कारकीर्दीत सुमारे 350 पेक्षा अधिक मालिकांमध्ये व हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. हिंदी चित्रपटांशिवाय त्यांनी गुजराती चित्रपटात सुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. कदाचित तुम्हाला ठाऊक असेल की त्यांचे सुरुवातीचे आयुष्य हे खूप अडचणींनी भरलेले होते, परंतु त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सतत परिश्रम करत राहिले व यशस्वी झाले.

कारकिर्दीत केले त्यांनी कठोर परिश्रम- एका मुलाखती दरम्यान ते त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलताना सांगितले होते की जेव्हा मी चित्रपट सृष्टीत नवीन आलो होतो तेव्हा मला व्यवस्थित काम भेटत नव्हते ज्यामुळे नेहमीच पैशाची अडचण होत होती. मी जवळपास 10 ते 15 वर्षांपासून आर्थिक अडचणीतून गेलो होतो.

त्यावेळी माझी स्थिती खूपच वाईट होती. त्यांनी सांगितले की कधी कधी तर कामाचे पैसे सुद्धा भेटत नव्हते आणि पैसे नसल्या कारणामुळे जेवण सुद्धा भेटत नव्हते. कधी फक्त 3 रुपयांसाठी 24 – 24 तास काम करावे लागत होते.

घनश्याम नायक सांगतात की त्यांच्याकडे घर भाड्यासाठी तसेच मुलांच्या शुल्कासाठी सुद्धा पैसे नव्हते. अशा परिस्थितीत ते आपल्या शेजाऱ्यांकडून पैसे उधार मागत होते आणि मग त्या पैशांनी घर भाडे व मुलांचे शुल्क भरत होते.

जाणून घ्या किती संपत्तीचे मालक आहेत नट्टु काका- तुम्हाला कदाचित ठाऊक असेल की घनश्याम नायक यांनी केवळ वयाच्या 7 व्या वर्षी ‘ मासूम ‘ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. असे म्हणले जाते की त्यांच्या नसानसात अभिनय आहे, हेच कारण आहे की त्यांनी आयुष्यात कधी हार मानली नाही.

त्यांनी आपल्या कारकीर्दीत मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये अनेक छोट्या – मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की ‘ तारक मेहता…’ या मालिकेत काम सुरू केल्या नंतर माझ्या आयुष्यात स्थिरता आली. हा कार्यक्रम त्यांच्यासाठी एक निश्चित उत्पन्नाचे स्त्रोत बनले. आज घनश्याम यांच्याकडे मुंबईमध्ये 2 – 2 घर आहेत.

घराघरात नट्टु काका या नावाने प्रसिद्ध- वर्षानुवर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नट्टु काका यांची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांना त्यांच्या खऱ्या नावाने अत्यंत कमी लोक ओळखतात. खरतर त्यांना घरात नट्टु काका या नावानेच ओळखले जाते. ज्यामुळे त्यांचे मित्र पण त्यांना याच नावाने हाक मारतात.

Leave a Reply

Your email address will not be published.