दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार कमल हसन यांचे सिनेसृष्टीत मोठे नाव मानले जाते. दाक्षिणात्य चित्रपटात जिथे त्याने मोठे नाव कमावले तर तेच बॉलिवूड मध्ये सुद्धा त्यांनी आपल्या प्रतिभेच्या दमावर स्वतः ला स्थापित केले. आपल्या चित्रपटातील कारकिर्दीत कमल हसन यांनी एकापेक्षा एक चित्रपट केले आणि त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कारासोबतच इतर अन्य पुरस्कार देखील मिळवले. तथापि, कमल हसन यांचे नाव बऱ्याच वेळा वादविवादात सुद्धा फसले आहे. असाच एक वाद तेव्हा झाला होता जेव्हा रेखा यांनी त्यांच्यावर जबरदस्ती चुं-बन घेण्याचा आरोप लावला होता.
तमिळ अभिनेत्री रेखा यांनी कमल हसन यांच्यावर लावला आरोप- कमल हसन हे एक उत्कृष्ट कलाकार आहेत आणि त्यांच्या अनेक चित्रटांमधून त्यांनी हे सिद्ध केले आहे. तथापि, एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यावर अभिनेत्री रेखा ने जबरदस्ती चुं-बन घेण्याचा आरोप लावला होता. कमल हसन यांच्यावर आरोप लावणाऱ्या रेखा या तमिळ चित्रपटातील अभिनेत्री होत्या. रेखा यांचे म्हणणे होते की जेव्हा कमल हसन यांनी त्यांना जबरदस्ती पकडुन चुं-बन घेतले तेव्हा त्यांचे वय हे केवळ 16 वर्ष होते.
रेखा या कमल हसन यांच्यावर आरोप लावताना म्हणतात की 1986 मधील बालचंदर यांचा चित्रपट ‘ पुन्नागै मन्नन ‘ मधील एका दृश्यात कमल हसन यांनी रेखा यांना न सांगता चुं-बन घेतले होते. रेखा या म्हणाल्या होत्या की मी त्यावेळेस चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक सुरेश कृष्णा आणि वसंत यांना म्हणले होते की , ‘ चुंबनाबद्दल मला सांगितले नव्हते ‘. यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘ असा विचार कर की एका मोठ्या राजाने एका छोट्याशा मुलीचे चुं-बन घेतले आहे. ‘
रेखा यांची नेहमीच याबद्दल तक्रार होती की कमल हसन यांनी त्यांना न सांगता जबरदस्तीने चुं-बन घेतले आणि या घटनेबद्दल त्यांनी कधी माफी मागितली नाही. त्यांचे असे म्हणणे होते की त्यांनी का माफी मागावी, तो चित्रपट सुपरहिट होता. या विषयावर कमल हसन यांचे काहीच मत नाही आले.
बॉलिवूडची उमरवो जान सुद्धा झाली होती याची शिकार- एखाद्या अभिनेत्यावर अभिनेत्रीने जबरदस्तीने चुं-बन घेऊन आरोप लावल्याची घटना ही पहिलीच नाहीये. तमिळच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा ऐवजी बॉलिवूड मधील सदाबहार अभिनेत्री रेखा सुद्धा या घटनेचा शिकार झाली आहे. रेखा यांचा ‘ अंजना सफर ‘ या चित्रपटादरम्यान त्यांच्या सोबत सुद्धा हीच घटना घडली होती.
त्यावेळेस रेखा ह्या अवघ्या 15 वर्षाच्या होत्या आणि हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेता विश्वजित यांनी रेखा यांना पकडून अवघे 5 मिनिट चुं-बन घेतले होते. रेखा यांना सुद्धा या दृश्याबद्दल काहीच माहिती नव्हती सोबतच त्यांचे वय हे केवळ 15 वर्ष होते.
तेच विश्वजित त्यांच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठे होते. हे दृश्य संपल्यानंतर रेखा रडायला लागल्या. तसेच चुं-बनाच्या दृश्यामुळे चित्रपट हा 10 वर्षांसाठी लटकला होता. त्यावेळी सेन्सॉर बोर्ड कडून असे दृश्य पास होणे खूपच अवघड होते.
या चित्रपटाबद्दल इतका वाद झालं होता की तो न्यायालयापर्यंत पोहचला होता. यासंदर्भात विशेष समिती सुद्धा गठित करण्यात आली होती. समितीने चित्रपटाच्या दृश्याची चौकशी केली आणि म्हणले की या चित्रपटाच्या चुं-बन वाल्या दृश्यात जे दोन लोक चुं-बन घेत आहेत जर त्यांना काही अडचण नसेल तर तिसऱ्याला सुद्धा आपत्ती नसली पाहिजे.
यानंतर हा चित्रपट दहा वर्षानंतर ‘ दो शिकारी ‘ या नावाने प्रदर्शित झाला. हे चुं-बनाचे दृश्य रेखाच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या विवादांमधून एक मानले जाते ज्याला रेखा पण स्वतः कधी विसरू नाही शकल्या.