आज जरी सलमान व कॅटरिना हे दांपत्य नसले तरी ते चांगले मित्र आहेत व प्रत्येक वेळेस ते एकत्र दिसतात.बॉलिवूड मध्ये अशा बऱ्याचशा प्रेम कथा आहेत ज्यांनी खूप चर्चा निर्माण केली परंतु त्यांच्या प्रेम कथा या कधी लग्नाच्या मंडपापर्यंत गेलीच नाही. अशीच एक प्रेम कथा ही सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची होती. चित्रपटसृष्टीत एक वेळ अशी होती की जेव्हा कॅटरिना व सलमान यांचे नाव एकत्र घेतले जात होते. दोघांची जवळीक बघून सर्वांना वाटत होते की सलमान हे आता कॅटरिना सोबत लग्न नक्की करतील.
तथापि, असे तर काही झाले नाही त्याऐवजी सलमानने रागात येऊन कॅटरिना सोबत असे काही कृत्य केले की यामुळे दोघेही वेगळे झाले. सलमान व कॅटरिना हे अजून पण मित्र आहेत. परंतु दोघांमधील प्रेम हे खूप आधीच संपले.
कॅटरिना ह्या एक ब्रिटिश मॉडेल आहेत आणि चित्रपट ‘ बुम ‘ मधून त्यांनी बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. जेव्हा कॅटरिना बॉलिवूड मध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांना हिंदी योग्यरीत्या बोलता येत नव्हते. परंतु आता त्या खूप चांगल्या पद्धतीने हिंदी बोलतात. मात्र कॅटरिना यांनी आपल्या अभिनयाने व सौंदर्याने लोकांच्या हृदयात जागा बनवली आहे.
कॅटरिना ह्या सुद्धा एक बाहेरील व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या स्वतः च्या हिमतीवर बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. तथापि, त्यांना चित्रपटांमध्ये मोठा ब्रेक हा सलमान खान यांच्या चित्रपटातून मिळाला.कॅटरिना यांनी चित्रपट बुम मधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, परंतु हा चित्रपट अपयशी ठरला.
यानंतर राम गोपाल वर्मा यांच्या ‘ सरकार ‘ चित्रपटात कॅटरिना यांना एक छोटीशी भूमिका मिळाली. या चित्रपटाच्या यशाचा कॅटरिना यांना जास्त काही फायदा नाही झाला, परंतु त्या सलमान यांच्या नजरेत आल्या. सलमान ने त्यांना त्यांचा चित्रपट ‘ मैं ने प्यार किया ‘ मध्ये एक संधी दिली. चित्रपट हा सुपरहिट ठरला व कॅटरिना यांचे नशीब उजळले.
या चित्रपटासोबतच सलमान व कॅटरिना यांच्या अफेयर च्या बातम्या समोर यायला सुरुवात झाली. तथापि, त्या या दिवसात यशाच्या पायऱ्या चढत होत्या. या वेळी अक्षय व कॅटरिना यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिस वर प्रदर्शित झाले. यामध्ये ‘ नमस्ते लंडन ‘, ‘ हमकों दिवाना कर गये ‘ आणि ‘ सिंग इज किंग ‘, ‘ वेलकम ‘ इ. चित्रपट सामील होते. ‘ नमस्ते लंडन ‘, ‘ सिंग इज किंग ‘ आणि ‘ वेलकम ‘ हे चित्रपट मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरले आणि दर्शकांना अक्षय व कॅटरिना यांची जोडी आवडायला लागली.
त्यावेळी कॅटरिना व अक्षय यांच्यात खूप जवळीक वाढल्या गेली. सलमान यांना अक्षय व कॅटरिना यांची मैत्री आवडत नव्हती. सलमान यांची अशी इच्छा होती की कॅटरिना यांनी कोणासोबत पण मैत्री करू नये तसेच त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत काम सुद्धा करू नये. यांनतर दोघांमध्ये वादविवाद होयला सुरुवात झाली. यानंतर एक बातमी आली की सलमान व कॅटरिना यांच्यात कॅफेमध्ये भांडण झाले आहे.
वर्ष 2008 च्या अहवालानुसार पाहिले तर कॅटरिना सोबत भांडण करताना सलमान यांचा राग हा इतका अनावर झाला होता की त्यांनी कॅटरिना यांना एक चापट मारली होती. एवढेच नाही तर सलमान यांनी दारूच्या नशेत कॅटरिना यांच्या घरासमोर तमाशा केला होता. यानंतरच कॅटरिना यांनी सलमान सोबत ब्रेकअप केला व त्यांचे हे नाते तुटले.
कॅटरिना या सलमानच्या प्रियसी नाही राहिल्या, परंतु दोघांची मैत्री ही कधी नाही तुटली. ब्रेकअप नंतरही सलमान आणि कॅटरिना यांनी ‘ टायगर जिंदा हैं ‘, ‘ एक था टायगर ‘ आणि ‘ भारत ‘ सारख्या चित्रपटात काम केले. यादिवसात कॅटरिना विकी कौशल ला डेट करत आहे या चर्चेत आहे. याचवेळी सलमान यांचे नाव हे पुन्हा युलिया वंतुर सोबत जोडले जात आहे.