दिपीका पादुकोण हि या चित्रपट जगातील सर्वात महाग अभिनेत्री आहे. आता ती प्रभास सोबत एका चित्रपटात काम करण्यास सज्ज आहे. नाग अश्र्विनच्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. आता असे बोले जात आहे की दिपीका पादुकोणने या चित्रपटासाठी सुमारे 20 कोटी एव्हडी फी निश्चीत केली आहे. जर ‘पद्मावत’मधील या नायिके बदल ही गोष्ट खरी असेल तर ती सध्याच्या काळातील सर्वात महागडी अभिनेत्री असेल.
जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा दिपीकाचा असा विश्वास आहे की प्रत्येकाला समान फी मिळावी,मग ती नायक असो की नायिका. जिथे या चित्रपटाचा प्रश्न आहे तर प्रभासबद्दल असं बोल जात की तो या चित्रपटासाठी 50 कोटी रुपये घेत आहे. पण दिपीकाचे 20 कोटी देखील तीला या देशातील सर्वात महागडी अभिनेत्री बनवेल.
तसे,या चित्रपटाबद्दल आणखी एक बातमी आहे. की या चित्रपटासाठी फीमेल लीड रोल पुन्हा लिहिण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे, याचे कारण म्हणजे दिपीका पादुकोण आहे. दिपीका आल्या नंतरच हा रोल बदला गेला आहे आणि आणखीन वजनदार बनवन्यात आला आहे.
दिपीकाचा आधीचा चित्रपट ‘छपाक’ होता. मेघना गुलजार दिग्दर्शित होता या चित्रपटाने फारसी कमाई केली नाही. दिपीका विक्रांत मेस्सीसोबत होती आणि हा चित्रपट फ्लाॅप ठरला.
हा दिपीकाचा प्राॅडक्शन हाऊसने बनवलेला चित्रपट होता. या चित्रपटाच्या प्रचारात्मक कार्यक्रमांची अधिक चर्चा झाली, यामध्ये दिपीकाच्या अश्रूंचे वर्णन नेटिझन्सनी मगर म्हणून केले गेले.
अॅ-सिड अटॅक सव्हायव्हर लक्ष्मी अग्रवालची बायोपिक हा चित्रपट होता, जो लोकांना पाहण्यात रस नव्हता. दिपीकाचा शेवटचा हिट चित्रपट ‘पद्मावत’ होता जो संजय लीला भन्साळी दिग्दर्शित होता.