अ सुटेबल बॉय या चित्रपटाचा ट्रेलर हा खूप चर्चेत आहे, दुप्पट वयाच्या तब्बू सोबत ईशान खट्टर चा रोमांन्स हा चर्चेत आहे. परंतु यांच्या अगोदर अनेक कलाकारांनी सुद्धा अशा भूमिका साकारल्या आहेत. चला जाणून घेऊया.ईशान खट्टर आणि तब्बू स्टारर, यांची दूरदर्शन वरील मालिका अ सुटेबल बॉय चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही मालिका नेटफ्लिक्स वर 26 जुलै ला प्रदर्शित होणार आहे. ही मालिका विक्रम सेठ यांच्या ‘ अ सुटेबल बॉय ‘ या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित आहे.
या मालिकेचे ट्रेलर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दुप्पट वयातील तब्बुचे आणि ईशान चे चुं-बनाचे दृश्ये आणि लव मेकिंग दृश्ये ट्रेलर ला खळबळजनक बनवत आहेत. 24 वर्षीय ईशान आणि 48 वर्षीय तब्बू यांची केमिस्ट्री खूप चर्चेमध्ये आहे. खरं तर ही पहिलीच वेळ नाही आहे, जास्त वयाचे अंतर असणाऱ्या कलाकारांनी सुद्धा यापूर्वी रोमांन्स केला आहे.
गेल्या वर्षी 2019 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट दे दे प्यार दे मध्ये अजय देवगण हे तरुण अभिनेत्री रकुल प्रीत सोबत रोमांन्स करताना दिसले गेले. दोघांच्या वयात 22 वर्षाचे अंतर आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि एका आधुनिक संदेशासह चित्रपटाला स्वीकारण्यात आले व चित्रपट हा खूप चालला
वर्ष 2011 मध्ये आलेला चित्रपट सात खून माफ मध्ये प्रियांका चोप्रा आणि इरफान खान यांच्यामध्ये खळबळजनक दृश्य दाखवले गेले. प्रियांका व इरफान या दोघांमध्ये 16 वर्षाचे अंतर आहे.
2015 मध्ये आलेला चित्रपट डर्टी पॉलिटिक्स हा खूप चर्चेत राहिला. मल्लिका शेरावत आणि ओम पुरी यांचा रोमांन्स हा खूप चर्चेत राहिला. मल्लिकाने ओम पुरी यांच्यासोबत खळबळजनक दृश्ये दिले होते. दोघांच्या वयांमध्ये 23 वर्षांचा फरक आहे. परंतु कथेला एकदम उत्तम प्रकारे शोभत आहे.
हा चित्रपट कोणाला कसा विसरता येईल, चिनी कम या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि तब्बू यांच्या जोडीला खूप पसंती मिळाली. दोघांची केमिस्ट्री ही विलक्षण होती. 2007 मध्ये आलेल्या या चित्रपटात अमिताभ व तब्बू यांना एका रोमँटिक जोडप्याच्या रुपात दाखवले होते. दोघांमध्ये 29 वर्षाचा फरक आहे
त्याचवेळी 2003 मध्ये आलेला क्राईम थ्रिलर चित्रपट मकबूल मध्ये तब्बू आणि पंकज कपूर यांच्यात रोमांन्स बघायला भेटला होता. यादोघांच्या मध्ये 18 वर्षाचे अंतर आहे.1996 मध्ये प्रदर्शित झालेला खिलाडीयों का खिलाडी या चित्रपटात अक्षय व रेखाने रोमँटिक दृश्ये दिले होते.
रेखा ही अक्षय पेक्षा 13 वर्षांनी मोठी आहे. या चित्रपटातील रेखा व अक्षय यांची केमिस्ट्री बघून संपूर्ण सिनेसृष्टीत चर्चा सुरू झाली होती. हे सुद्धा म्हणले जात होते की रेखा व अक्षय मध्ये काहीतरी चालू आहे. त्यावेळी अक्षय हे रविना टंडन ला डेट करत होते.