बॉलीवुड मधील हे १० कलाकार ५० शी ओलांडूनही आहेत अविवाहित

बॉलिवूड मधील कलाकारांना त्यांच्या हिशोबाने स्वतः आयुष्य जगायला आवडते. कलाकारांचे आयुष्य हे सामान्य लोकांपेक्षा खूप भिन्न असते. कामामुळे बऱ्याच वेळा कलाकारांना हे सुद्धा समजत नाही की त्यांना त्यांचे आयुष्य घालवण्यासाठी एका जोडीदाराची गरज आहे. बॉलिवूड मध्ये असे अनेक मोठे कलाकार आहेत जे लग्न न करता खूप आनंदी आहेत. तर चला आज आम्ही तुम्हाला या कलाकारांबद्दल सांगतो.

नगमा – पासून बागी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या नगमा यांनी आता राजकरणात प्रवेश केला आहे. वयाच्या 45 व्या टप्प्यात आल्यानंतरही त्या एकट्याच आयुष्य जगत आहे. त्यांनी हिंदी शिवाय तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली, भोजपुरी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे.

तब्बू- बॉलिवूड मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तब्बूने विजयपथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि सहा फिल्म फेयर जिंकणाऱ्या तब्बूचे वय 49 झाले आहे तरी सुद्धा त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही. जरी एकेकाळी त्यांचे नाव हे अजय देवगनशी जोडले जात होते.

सुष्मिता सेन- माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनने सुद्धा अद्याप लग्न केले नाही. जरी त्या आजकाल रोहमन शाॅल ला डेट करत आहेत. कदाचित दोघांचे लग्न सुद्धा होईल. 44 वर्षीय सुष्मिता ही दोन मुलांची आई बनली आहे. त्यांनी तिच्या दोन्ही मुलांना दत्तक घेतले आहे.

अमिषा पटेल- कहो ना प्यार है, गदर सारख्या सुपरहिट चित्रपटात काम करणारी अभिनेत्री अमिषा पटेल आतापर्यंत अविवाहित आहे. 44 वर्षीय अमिषा खूपच बोल्ड आणि लोक त्यांना रोज सोशल मीडियावर ट्रोल करत असतात. अमिषा ह्या शेवटी भैय्याजी सुपरहिट या चित्रपटात दिसली होती.

सलमान खान- सलमान खान यांच्या लग्नाची बातमी ऐकण्यासाठी प्रत्येक चाहता हा तळमळत आहे. लग्नाच्या प्रश्नावर सलमान नेहमी गोल गोल उत्तर देवून निघून जातात. जरी 54 वर्षीय अभिनेत्याचे नाव जरी अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले असेल तरी त्यांचा संबंध कधी लग्नाच्या उंबरठ्यावर नाही आला आहे.

अक्षय खन्ना- विनोद खन्ना चा मुलगा अक्षय खन्ना अद्यापही घर बसवलेले नाही. अक्षय यांनी 1997 मध्ये ‘ हिमालयपुत्र ‘ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. बॉलिवूड मधील सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये त्यांची गणना केली जाते. वयाच्या 45 व्या वर्षी सुद्धा अक्षय एकटेच आयुष्य घालवत आहेत.

उदय चोप्रा- यश चोप्रा यांचा छोटा मुलगा उदय चोप्रा याने सुद्धा चित्रपटांमध्ये नशीब आजमावले पण त्यांचे नाणे काही चालले नाही. मोहब्बते या चित्रपटापासून सुरुवात करणारे उदय चोप्रा शेवटी धूम 3 चित्रपटात दिसले होते. वयाच्या 47 व्या वर्षी सुद्धा त्यांनी अजून लग्न नाही केले.

अभय देओल- सुपरस्टार धर्मेंद्र यांचा पुतण्या अभय देओल ने जरी कमी चित्रपटात काम केले असेल तरी त्यांच्या अभिनयाचे नेहमी कौतुकच केले जाते. सोशल मीडियावर अभय खूप सतर्क असतात. अभय चे वय हे 44 वर्ष आहेत आणि त्यांनी अजून सुद्धा लग्न केलेले नाही.

रणदीप हुड्डा- आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जाणारे रणदीप हुड्डा हे 44 वर्षाचे झाले आहेत तरी सुद्धा अद्यापही त्यांनी लग्न केलेले नाही. जरी ते बऱ्याच काळापासून मॉडेल लिन लेशराम ला डेट करत आहेत. कदाचित लवकरच दोघांचे लग्न सुद्धा होईल.

तनिषा मुखर्जी- काजोलची बहिण तनिषा मुखर्जी ही सुद्धा अजूनपर्यंत अविवाहित आहे. त्यांनी बऱ्याच चित्रपटात काम केले परंतु त्यांना यश मिळाले नाही. तनिषा यांचे नाव उदय चोप्रा व अरमान कोहली यांच्याशी जोडले गेले होते परंतु त्यांची जोडी बनू शकली नाही. 42 वर्षीय तनिषा ही अजूनही एकटीच आयुष्य व्यतीत करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.